Yavatmal News : नापिकीच्या चक्राने सर्वस्व हिरावलं; कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याने कंटाळून जीवन संपवलं

Yavatmal News : नापिकीच्या चक्राने सर्वस्व हिरावलं; कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याने कंटाळून जीवन संपवलं

Yavatmal News: सततच्या नापिकीमुळे वाढत गेलला कर्जाचा डोंगर आणि आजापणाला कंटाळून कर्जबाजारी शेतकरी दांपत्याने अखेर आपले जीवन संपवलय. ही हृदयद्रावक घटना यवतमाळच्या (Yavatmal News) दिग्रस तालुक्यातील डेहनी शेत शिवारात घडलीय. किशोर बाळकृष्ण नाटकर (45) आणि पत्नी वनिता किशोर नाटकर (40) असे मृत दाम्पत्याचे नाव आहेत. मृतक दाम्पत्य हे सकाळी 7 वाजताच्या सुमारास शेतात कापशी काढण्यासाठी घरून निघाले. शेताच्या वाटेतच वामन दिघ्घलवार यांचे शेत असुन त्यांचे विहीरीवरुनच डेहणी गावाला पाणी पुरवठा होता. याच विहिरीत दोघांनीही उडी घेऊन आत्महत्या केलीय. ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत नाटकर हे विहिरीकडे गेले असता, त्यांना दोन मृतदेह विहीरीत तरंगत असल्याचे दिसले. घटनेचा माहिती मिळताच आर्णी पोलिसांनी (Yavatmal Police) घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह गावक-यांच्या मदतीने बाहेर काढुन पंचनामा केला. तेव्हा दोन्ही मृतदेह नाटकर दांपत्याचे असल्याचे निदर्शनास आले.

नापिकीच्या चक्राने सर्वस्व हिरावलं

प्राप्त माहितीनुसार, मृतक किशोर बाळकृष्ण नाटकर यांच्यावर विविध बँकांचे कर्ज असल्याचे बोलल्या जात आहे. तसेच किशोर कुटुंबामध्ये सगळ्यात मोठे असून ते पूर्णत: शेतीवर अवलंबून होते. त्यांचाकडे स्वत: च्या मालकीची सहा एकर कोरडवाहू शेती आणि तिला जोड म्हणून गावातीलच दहा एकर ओलिताची शेती त्यांनी मक्त्याने घेतली होती. मात्र, मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतीत सातत्याने अपयश आले. परिणामी कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यावरही मात करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले. मात्र त्यानंतरही प्रामाणिक कष्ट निष्फळ ठरले. सोबतच कौटुंबिक जबाबदारी आणि सततच्या नापिकीच्या चक्राने होतं नव्हतं ते सारे हिरावलं. त्यातून आवाक्या बाहेर वाढत चाललेल्या कर्जाचा भाराखाली नाटकर दांपत्याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविलीय. मात्र त्यांच्या या कृतीमुळे नाटकर कुटुंबीयांवर मोठी शोककळा पसरली आहे.

पाच लाख लिटरची पाण्याची टाकी अचानक कोसळली 

बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील पाच लाख लिटर क्षमता असलेली पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार ही टाकी 8 ते 10 वर्षांपूर्वी बांधण्यात आले होती. मात्र, अचानक ही पाण्यानी भरलेली टाकी कोसळल्याने परिसरात एकच तारांबळ उडाली आहे. भरलेली पाण्याची टाकी असल्याने टाकीतील पाणी परिसरातील आठ ते दहा घरामध्ये घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

दरम्यान, ही टाकी आठ ते दहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आली होती. सध्या रामनवमीनिमित्त पोहरादेवी इथं हजारोंच्या संख्येने बंजारा भाविक दाखल झालेले आहे. मात्र, त्या टाकीच्या परिसरात कोणीच नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. मात्र, या प्रकरणामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीच्या बांधकामावर आणि त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने