एकतर्फी प्रेमातून काँग्रेस नेत्याच्या मुलीची भरदिवसा हत्या, कालेजच्या आवारात घडली घटना; थरारक VIDEO समोर

एकतर्फी प्रेमातून काँग्रेस नेत्याच्या मुलीची भरदिवसा हत्या, कालेजच्या आवारात घडली घटना; थरारक VIDEO समोर

हुबळी : कर्नाटकात (Karnataka) एक अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून काँग्रेस  (Congress)नेत्याच्या मुलीची कॉलेजच्या आवारात भर दिवसा हत्या करण्यात आली आहे. प्रपोझ केल्यानंतर तरुणीने नकार दिल्याने रागावून 24 वर्षीय मुलाने विद्यार्थ्यीनीची हत्या केली. तरुणी केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमसीएची (MCA) विद्यार्थिनी होती. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना कोणत्याही निर्जन भागात घडली नसून कॉलेजच्या बीव्हीबी कॅम्पसच्या कॉरिडॉरमध्ये घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची हत्या

हुबळी-धारवाड महानगरपालिकेचे काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिची गुरुवारी बीव्हीबी कॉलेज कॅम्पसमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ती एमसीएच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. 18 एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी फयाजला अटक केली आहे. दरम्यान, फयाज हा तरुणीचा जुना वर्ग मित्र होता. फयाजला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी राज्यातील अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली आहेत. 

कॉलेजच्या आवारत तरुणीवर चाकू हल्ला

फयाज नावाच्या तरुणाने 23 वर्षीय विद्यार्थीनीवर कॉलेजच्या आवारातच चाकूने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आरोपी तरुणीवर चाकू हल्ला करताना दिसत आहे. चाकू हल्ल्यामुळे तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. गंभीर जखमी विद्यार्थिनीला कॅम्पसपासून सुमारे 2 किमी अंतरावर असलेल्या KIMS रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हा मुलगा या कॉलेजमध्ये शिकत नसून त्याने कॉलेजमध्ये येऊन तरुणीवर हल्ला केला

आरोपीच्या आईने मागितली माफी

काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची हत्या करण्यात आली. आता आरोपी फयाजच्या आईने मयत तरुणीच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. आपल्या मुलाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही आरोपीच्या आईने केली आहे. व्यवसायाने शिक्षिका असलेल्या फयाजची आई मुमताज म्हणाली, माझ्या मुलाने जे काही केले त्याबद्दल, मी कर्नाटकातील लोकांची आणि नेहाच्या कुटुंबाची माफी मागते. हा नेहा आणि तिच्या कुटुंबावर झालेला मोठा अन्याय आहे.

काँग्रेस आणि विरोधी पक्षांसाठी भांडणाचा मुद्दा

नेहाच्या मृत्यूचं प्रकरण कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यातील राजकीय भांडणाचा मुद्दा ठरला आहे. काँग्रेसने ही घटना वैयक्तिक घटना म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तर भाजपने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचं म्हटलं आहे.

लव्ह जिहादचा आरोप

नेहाचे वडील काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी या गुन्ह्याला 'लव्ह जिहाद' म्हटल्याने कर्नाटक सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी दावा केला की, आरोपींनी आपल्या मुलीला अडकवण्याची योजना आखली होती. केंद्रीय मंत्री आणि धारवाड लोकसभेतील भाजपचे उमेदवार प्रल्हाद जोशी यांनीही या घटनेमागे लव्ह जिहादचा अँगल असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडीओ : एकतर्फी प्रेमातून तरुणीची भरदिवसा हत्या

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by The Tatva (@thetatvaindia)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

... म्हणून केजरीवाल तुरुंगात आंबे अन् मिठाई खातात; कोर्टात ED चा गंभीर आरोप

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने