Vaibhav Deore : खंडणीखोर वैभव देवरेने जमवली कोट्यावधींची 'माया', नाशिकमधील खासगी सावकाराचं पितळ पडलं उघडं

Vaibhav Deore : खंडणीखोर वैभव देवरेने जमवली कोट्यावधींची 'माया', नाशिकमधील खासगी सावकाराचं पितळ पडलं उघडं

Nashik Crime News : अवैधरीत्या सावकारी करणारा वैभव यादवराव देवरे (Vaibhav Deore) याला इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar Police) काही दिवसांपूर्वी अटक केली होती. तो पहिल्या गुन्ह्यात पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत (Police Custody) आहे. वैभव देवरेने भाजपचे पदाधिकारी जगन पाटील (Jagan Patil) यांना तब्बल तीन कोटी रुपयांना गंडा घातला आहे. तसेच शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनाही लुटले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

गोविंदनगर परिसरातील व्यावसायिक विजय खानकरी यांनी 12 लाखांच्या खंडणी प्रकरणी वैभव देवरे (रा. चेतनानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर देवरे यांचे पितळ उघडे पडत गेले. वैभव देवरे याच्याविरोधात तक्रारींचा ओघ सुरूच आहे. 

भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी उकळले

संशयित वैभव देवरे याने शहर-जिल्ह्यातील अनेकांना व्याजाने पैसे देत त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वादराने रकमा वसूल केल्या आहेत. सिडकोतील भाजपचे पदाधिकारी जगन पाटील यांनी संशयित देवरे यांच्याकडून 20 लाख रुपये व्याजाने घेतले असता, देवरे याने त्यांच्याकडून तब्बल तीन कोटी रुपये उकळले आहेत. दुसऱ्या एका गुन्ह्यात चार लाख रुपये व्याजाने घेतलेल्या व्यक्तीकडून 28 लाख रुपये घेतले आहेत. आणखीही तक्रारी देवरे याच्याविरोधात येत आहेत.

10 लाखांचे कर्ज दिले अन् थेट फ्लॅटच बळकावला

नवीन सोनवणे यांनी वैभव देवरे याच्याकडून 10 लाख रुपये व्याजाने घेतले. त्या मोबदल्यात त्यांचे वडील अशोक सोनवणे यांच्या नावे असलेला फ्लॅट देवरे याच्याकडे गहाण ठेवून दस्तऐवज करून दिले होते. त्यानंतर व्याजापोटी 19 लाख रुपये देवरे याला धनादेशाद्वारे सोनवणे यांनी दिले; मात्र तरीसुद्धा देवरे याने फ्लॅटची कागदपत्रे, करारनामा रद्द केला नाही व फ्लॅट बळकावला.   

चार लाखांच्या मोबदल्यात मोठी रक्कम उकळली

जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सोनवणे यांचा मित्र दीपक साळुंखे यास कार खरेदी करावयाची असल्यामुळे त्याने दयाराम खोडे यांच्याकडून कार (एमएच 48 अेसी 5736) 5 लाखांत खरेदी केली. यावेळी 1 लाख रुपये साळुंखे याने खोडे यांना रोख स्वरूपात दिले होते. दरम्यान, पैशांची आवश्यकता असल्याने सोनवणे यांच्या अजून एका मित्राद्वारे देवरे याच्याशी ओळख झाली. सोनवणे यांनी देवरेशी संपर्क साधून 10 टक्के व्याजदाराने दोन टप्प्यांत धनादेशाद्वारे प्रत्येकी 2 लाख, असे एकूण 4 लाख रुपये घेतले. त्या मोबदल्यात कार त्याच्याकडे गहाण ठेवून घेतली. 2021 साली साळुंखे याने देवरे यास 4 लाख रुपये परत केले होते. देवरे याने धमक्या सुरूच ठेवल्याने घरातील सोने सोनाराकडे गहाण ठेवून पुन्हा साळुंखे याने 9 लाख रुपये व्याजापोटी देवरे यास दिले होते. आता वैभव देवरे याच्या विरोधात एका मागे एक तक्रारी दाखल होत असल्याने त्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वैभव देवरेने आणखी कुणाकडून खंडणी उकळली याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. 

आणखी वाचा 

बिश्नोई गँगच्या टार्गेटवर सलमान खान? गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत भाईजानला धमकी

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने