Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांचे फोटो समोर, केंद्रीय तपास यंत्रणांना लागला महत्त्वाचा सुगाव

Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांचे फोटो समोर, केंद्रीय तपास यंत्रणांना लागला महत्त्वाचा सुगाव

Salman Khan : रविवारची सकाळ ही बॉलीवूडकरांसाठी चांगलीच धक्कादायक ठरली. कारण बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर काहींनी गोळीबार केल्याचं समोर आलं. इतकच नव्हे तर यातील एक गोळी ही सलमानच्या घरात घुसल्याची देखील माहिती समोर आली होती. त्यानंतर आता सलमानच्या घराबाहेर हल्ला करणाऱ्यांचे फोटो देखील समोर आलेत. घराबाहेरील सीसीटिव्हीमध्ये हल्लेखोरांचे फोटो कैद झालेत. इतकच नव्हे तर या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांना देखील महत्त्वाचा सुगावा हाती लागल्याचं सांगण्यात येत आहे. 

या फोटोमध्ये दोन हल्लेखोर दिसत आहेत. त्यातील एक काळ्या आणि पांढऱ्या टीशर्टमध्ये तर दुसरा लाल टी-शर्टमध्ये दिसत आहे. या फोटोंच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरु असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि तपास यंत्रणा देखील शर्थीचे प्रयत्न करतायत. सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर दोन अज्ञांताकडून चार राऊंड फायर झाल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळाली. पहाटेच्या सुमारास दोन जणांची दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याची माहिती आहे. वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम सध्या घटनास्थळी तपास करत आहेत. 

भाईजानच्या घराबाहेरील गोळीबाराचा बिश्नोई गँगशी संबंध?

सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचं पथक दाखल झालं असून फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळाची पाहणी आणि तपास करण्यात येत आहे. आजच्या गोळीबाराचा बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिश्नोई गँगकडून सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन केली चर्चा, उपमुख्यमंत्र्यांनी देखील घेतली दखल

सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दखल घेतली आहे. तसेच सलमान सोबत मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून चर्चा देखील केली आहे. यावेळी मुख्यमंत्री यांच्याकडून सुरक्षे संदर्भात दिलासा देण्यात आला आहे. सलमान खानच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांच्या तपासातून खरी माहिती समोर येईल. त्यामुळे पोलिसांच्या तपास होईपर्यंत यावर काही सांगता येणार, नसल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. 

ही बातमी वाचा : 

Kiran Mane : ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला' नाटकाच्या प्रयोगाची विद्यापीठाकडून परवानगी रद्द, किरण मानेंची संतप्त पोस्ट, म्हणाले 'वर्चस्ववादी भेकड...'

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने