Salman Khan House Firing : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांना मिळाले मोठं यश

Salman Khan House Firing : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांना मिळाले मोठं यश

Salman Khan House Firing :   बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे अन्वेषण शाखेला (Crime Branch) मोठं यश मिळाले आहे. गुजरातमधील सूरत येथे तापी नदीत (Tapi River) फेकलेली दुसरे पिस्तुलही पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलिसांकडून  दोन दिवस तापी नदीत शोध मोहीम सुरू होती. 

दोन दिवसांची शोधमोहिम दोन पिस्तुल हस्तगत

मुंबई पोलिसांच्या तपास पथकाकडून सलग दोन दिवस शोधमोहिम सुरू होती. या दोन दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर दोन पिस्टल आणि 3 मॅगझिन नदीत सापडल्या. सोमवारपासून गुन्हे शाखेचे पथक गुजरातच्या तापी नदीत शोधमोहीम करत होते. युनिट 9 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वात शोधमोहिम सुरू होती.

शूटर्सला 10 राउंड गोळीबार करण्याचे होते आदेश

मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर 10  राऊंड गोळीबार करण्याचे आदेश हल्लेखोरांना देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. गोळीबार केल्यानंतर  हल्लेखोरांनी आपले शस्त्र सूरतमधील तापी नदीत फेकले असल्याची माहिती दिली. 

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी पिस्तुल फेकण्यात आले, त्या ठिकाणी आरोपी विक्की गुप्ता याला नेण्यात आले होते. त्यानंतर शस्त्र शोधण्यास सुरुवात झाली. गोळीबार प्रकरणातील आरोपींविरोधात मुंबई पोलीस आणखी कलमे जोडण्याची शक्यता आहे. 

14 एप्रिल रोजी झाला होता गोळीबार


14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर  गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले. या घटनेच्या 72 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 

गोळीबाराचा संबंध बिश्नोई गँगशी

गोळीबाराचा लॉरेन बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) संबंध आहे. याआधी देखील बिश्नोई गँगकडून सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात काळविटांना देवासमान मानले जाते.  1998 मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच लॉरेन्सकडून सलमान खान धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता, घराजवळ गोळीबार झाला. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने