Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण; दोघांच्या भूजमधून मुसक्या आवळल्या, कोण आहेत आरोपी?

Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण; दोघांच्या भूजमधून मुसक्या आवळल्या, कोण आहेत आरोपी?

Salman Khan House Firing Case :  बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गुजरात मधील भूज येथून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विक्की गुप्ता आणि सागर पाल अशी आरोपींची नावे आहेत. 

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे आरोपी नवी मुंबईतील पनवेलमध्ये वास्तव्य करत होते. मागील एक महिन्यापासून त्यांनी पनवेलमध्ये भाड्यावर घर घेतले होते. या दोघांनी सलमान खानच्या घराची रेकी केली आणि त्यानंतर गोळीबार केला. दोन्ही आरोपींना सोमवारी रात्री उशिरा भूजमधून मुंबई पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी हे मूळचे बिहार राज्यातील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील आहे. या दोन्ही आरोपींना मुंबईत आणले जाणार आहे. 

रविवारी (14 एप्रिल 2024) मुंबईत अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. यानंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मुंबई पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फूटेज लागले असून आरोपींचा चेहराही समोर आला. 

गोळीबारानंतर हल्लेखोर बाईक सोडून फरार

सलमान खानच्या घराजवळ गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर सलमानच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माउंट मेरी चर्चजवळ मोटरसायकल  सोडून निघून गेल्याचे तपासात आढळले. आरोपींनी त्या ठिकाणाहून रिक्षा करून वांद्रे रेल्वे स्थानक गाठले. आरोपी बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले पण सांताक्रूझ रेल्वे स्टेशनवर उतरले आणि तेथून बाहेर पडले. त्यानंतर तो मुंबईतून पळून गुजरातच्या भूजमध्ये लपले. 

गोळीबाराचा संबंध बिश्नोई गँगशी

गोळीबाराचा लॉरेन बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) संबंध आहे. याआधी देखील बिश्नोई गँगकडून सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात काळविटांना देवासमान मानले जाते.  1998 मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच लॉरेन्सकडून सलमान खान धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता, घराजवळ गोळीबार झाला. 

व्हिडीओ : सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या भूजमधून मुसक्या आवळल्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने