Mumbai Police On Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरण : मुंबई पोलिसांनी A टू Z कहाणी सांगितली, लॉरेन्सचा परदेशातील भाऊ आरोपींच्या यादीत!

Mumbai Police On Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरण : मुंबई पोलिसांनी A टू Z कहाणी सांगितली, लॉरेन्सचा परदेशातील भाऊ आरोपींच्या यादीत!

Mumbai Police On Salman Khan House Firing Case :   अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन आरोपींना गुजरातमधून अटक केली. या आरोपींना मुंबईत आणल्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात आले. आरोपींना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा लक्ष्मी गौतम यांनी आज पत्रकार परिषद घेत सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचा सगळा घटनाक्रम सांगितला. 

सह पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांनी सांगितले की,  अभिनेता सलमान खान याच्या घरावरदोन आरोपींनी गोळीबार केला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो गुन्हा पुढे गुन्हे शाखेकडे वर्ग केला. घटनास्थळावरील सीसीटिव्हीत दुचाकीहून आलेल्या दोघांनी 5 गोळ्या झाडल्या. या गोळीबारानंतर अनमोल बिष्णोई याने फेसबुकवर गुन्ह्यांसंबधी पोस्ट केली होती. पोलीस तपासात आरोपी गुजरातला पळून गेल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलिसांची दोन पथक गुजरातला पाठवले असल्याचे लक्ष्मी गौतम यांनी सांगितले. 

भूज पोलिसांची मदत 

आरोपींच्या मागावर असलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकाला त्यांचे लोकेशन मिळाले. मात्र, आरोपींकडे घातक शस्त्र असल्याने आम्ही भूज पोलिसांच्या मदतीने आरोपींना अटक केली असल्याचे सह पोलीस आयुक्तांनी सांगितले.  आज सकाळी दोन्ही आरोपींना विमानाने मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. कोर्टाने 25 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली असल्याचे त्यांनी सांगितले. 

अनमोल बिष्णोईचाही आरोपी

सह पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांनी सांगितले की, अनमोल बिष्णोई याच्या  फेसबुकवरील धमकीवजा पोस्टचीही आम्ही चौकशी करत आहोत. या प्रकरणात जी माहिती पुढे येणार त्यानुसार गुन्ह्यात कलमांची वाढ केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर पूर्वी गुन्हे दाखल आहेत का हे आम्ही पडताळत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर काही तासांनंतर अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटवरून जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. हेच खाते चालवणाऱ्या अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीचे नावही आरोपी म्हणून FIR मध्ये नोंदवण्यात आले आहे. अनमोल बिश्नोई हा तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असून तो सध्या परदेशात आहे.

रविवारी (14 एप्रिल 2024) मुंबईत अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. यानंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मुंबई पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फूटेज लागले. त्यात आरोपींचा चेहराही समोर आला. 

इतर संबंधित बातमी : 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने