ब्रेकिंग! सलमान खानच्या घरात घुसली गोळी, घराबाहेरील गोळीबाराचं CCTV फुटेज समोर

ब्रेकिंग! सलमान खानच्या घरात घुसली गोळी, घराबाहेरील गोळीबाराचं CCTV फुटेज समोर

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार (Firing Outside House) झाला. रविवारी पहाटे झालेल्या गोळीबार प्रकरणाचा कसून तपास सुरु असून या संदर्भात आता नवीन अपडेट समोर आली आहे. घराबाहेरील गोळीबारात सलमान खानच्या घरात गोळी घुसल्याची माहिती समोर आली आहे. सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या प्रकरणी फॉरेन्सिक टीम, पोलीस, मुंबई गुन्हा शाखेकडून तपास सुरु आहे. पोलीस यंत्रणा अलर्टवर आहेत.

सलमान खानच्या घरात घुसली गोळी

रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भाईजान सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थाना बाहेर गोळीबार झाला. बाईक वरून आलेल्या दोन अज्ञातांनी केलं आणि पळ काढला. सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला. आता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या चार वॉचमनचे जबाब नोंदवले आहेत.

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

महत्त्वाचं म्हणजे सलमान खानच्या घरात एक गोळी घुसली. भाईजानच्या घरात गोळी घुसल्याची माहिती समोर आली आहे. गॅलरीत असलेल्या पडद्यातून एक गोळी आरपार झाली. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने गॅलरीमध्ये कुणी नव्हतं, गॅलरी रिकामी होती. एकूण पाच गोळ्या झाडण्यात आल्याचं आता तपासात समोर आलं आहे. एक गोळी पडद्यातून आरपार गेली आणि एक गोळी भिंतीवर लागली,  तर तीन पुंगळ्या रस्त्यावर सापडल्या आहेत.

गोळीबार प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे

सलमान खान गोळीबार प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे देण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, या गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचा हात असल्याची शक्यता आहे. सलमान खान कुटुंबियांना मागील काही काळात बिश्नोई गँगकडून धमक्या येत होत्या. पत्र आणि ईमेलद्वारे धमकी देण्यात आली होती. त्यामुळे आता झालेल्या गोळीबाराचं संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडला जात आहे.

गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर

दरम्यान, पहाटेच्या वेळी सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज एबीपीच्या हाती लागलं आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीने आपलं संपूर्ण शरीर झाकलेलं होतं. दोन जण दुचाकीवरून आले, फायरिंग केली आणि निघून गेले. एबीपीला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दुचाकीवरून जात असल्याचे दिसत असून हे फुटेज गोळीबारानंतरचं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

भाईजानच्या जीवावर का उठलाय लॉरेंन्स बिश्नोई? सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने