Buldhana News : शिवसेनेत प्रवेश केला म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाकडून युवकास बेदम मारहाण; गुन्हा दाखल

Buldhana News : शिवसेनेत प्रवेश केला म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाकडून युवकास बेदम मारहाण; गुन्हा दाखल

Lok Sabha Election 2024 : राज्यासह देशात अठराव्या लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरू असतांना बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील मलकापुर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातील नातेवाईक असलेल्या युवकाने आपल्या मित्रासह शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केल्यामुळे या युवकास जबर मारहाण करण्यात आलीय. या युवकाला घरी बोलावून बुलढाणा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा उमा तायडे, त्यांचे पती शिवचंद्र तायडे आणि मुलगा तेजस तायडे यांनी ही जबर मारहाण केलीय. यात युवक जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून पिडीत युवकाच्या आईच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी (Buldhana Police) गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीय. 

मलकापूर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा उमा तायडे या भाजपचा नेत्या आहेत. सोबतच त्यांचे पती शिवचंद्रा तायडे हे देखील भाजप पक्षात काम करतात. दरम्यान, पीडित मुलाने भाजपचेच काम करावं, इतर पक्षामध्ये जाऊ नये, अशी मागणी तायडे दाम्पत्याकडून करण्यात आली होती. मात्र, तसं न करता काही दिवसापूर्वी मलकापुर येथील रहिवासी असलेल्या आणि तायडे दाम्पत्याचा नातेवाईक असलेला या तरुणाने शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. कालांतराने ही बाब उमा तायडे यांना कळली. त्यावरून त्यांनी या युवकला घरी बोलावून जाब विचाराला. त्यानंतर या युवकाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा उमा तायडे, त्यांचे पती शिवचंद्र तायडे आणि मुलगा तेजस तायडे यांनी ही जबर मारहाण केली. यात युवक जखमी झाला असून सध्या त्यावर उपचार सुरू आहे.या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी पीडित मुलाच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल केला आहे. यात मलकापूर ग्रामीण पोलिसांनी कलम क्रमांक 324, 232, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केलाय. 

धावत्या रेल्वेतून फेकली 45 किलो गांजाची पाकिटे, नेमका प्रकार काय ?

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्टेशन जवळ धावत्या रेल्वे गाडीतून 45 किलो गांजाची पाकिटे फेकण्यात आली. काल रात्री अज्ञात रेल्वे गाडीतून काही अज्ञाताने ही 45 किलो वजनाची जवळपास नऊ पाकिटे नांदुरा रेल्वे स्टेशन जवळ फेकली असल्याची माहिती हाती आलीय. या प्रकरणाची माहिती मिळताच तात्काळ आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठत ही गांज्याची पाकिटे जप्त केलीय.

मात्र, अशा प्रकारे धावत्या रेल्वेतून गांजाची पाकिटे फेकण्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही नांदुरा रेल्वे स्टेशन जवळ अशा प्रकारच्या धावत्या रेल्वेतून अमली पदार्थांचे पाकीट सापडल्याची घटना घडली होती. त्यामुळे रेल्वेतून अमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. परिणामी, नांदुरा पोलीस त्या दिशेने पुढील तपास करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने