खडसेंपाठोपाठ नाशिकमधील भाजप आमदार देवयानी फरांदेंना धमकी, सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाल्याने खळबळ

खडसेंपाठोपाठ नाशिकमधील भाजप आमदार देवयानी फरांदेंना धमकी, सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाल्याने खळबळ

Devyani Pharande : नुकतीच एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आता त्यांच्या पाठोपाठ नाशिकमधील भाजपच्या (BJP) आमदाराला देखील धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

एकनाथ खडसेंना धमकीचे प्रकरण ताजे असतानाच नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयानी फरांदेंना (Devyani Pharande) धमकी देणारी पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. या प्रकारानंतर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून फरांदेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात येऊन त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण? 

नाशिकच्या उपनगर परिसरात 3 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका विशिष्ट जमावाकडून वाहनांची तोडफोड करत गोंधळ घालण्यात आला होता. याच विरोधात आमदार देवयानी फरांदेंनी आवाज उठवला होता. पोलिसांकडून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक शहरातीलच एका 21 वर्षीय युवकाला अटकही करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस सध्या करत असून या प्रकरणाच्या खोलवर जाऊन खऱ्या सुत्रधारांना अटक करावी, अशी मागणी देवयानी फरांदे यांनी केली आहे. 

काय म्हणाल्या होत्या देवयानी फरांदे? 

उपनगर येथे घडलेल्या घटनेनंतर देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी म्हटले होते की, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी घटना नाशिकमध्ये (Nashik News) घडली. एका धर्माचे लोक रस्त्यावर आले होते. हा पूर्वनियोजित कट होता का? अचानक असे लोक रस्त्यावर कसे आलेत. हिंदू धर्मात भीती निर्माण करणारे काम का करण्यात आले? याप्रकरणी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. सर तनसे जुदा करेंगे, आशा घोषणा देण्यात आल्या होत्या. या घटनेचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) बघितले का? नाशिक पोलिसांनी (Nashik Police) यावर काय कारवाई केली? असा सवाल देवयानी फरांदे यांनी पोलिसांना केला होता. तसेच देवयानी फरांदे यांच्याकडून नाशिक पोलिसांना 48 तासांचा अल्टीमेटम देखील देण्यात आला होता. 

अशी आहे देवयानी फरांदे यांची राजकीय कारकीर्द

देवयानी फरांदे या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षात आहेत. 1997 ते 2014 या कालावधीत त्या तीन वेळा नगरसेवक बनल्या. नाशिक महापालिकेत त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे. 2009 ते 2012 या काळात त्यांनी उपमहापौरपद भूषवले. 2004 ते 2013 मध्ये महिला मोर्चा प्रदेश चिटणीसपद त्यांनी सांभाळले आहे. विधिमंडळाच्या इतर मागासवर्गीय समिती व उपविधान समिती सदस्य आहेत. 2015 च्या तृतीय (हिवाळी) अधिवेशनातील सभाध्यक्ष तालिकेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली.  2019 मध्ये नाशिक विधानसभा (मध्य) मतदारसंघातून देवयानी फरांदे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. 

आणखी वाचा 

नाशिकच्या जागेचा पेच आणखी वाढणार! नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांची फडणवीसांकडे मोठी मागणी

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने