सासरी पोहोचताच नवरी रुममध्ये गेली, एका तासात असं काही झालं की, पाहून नवराच बेशुद्ध पडला

सासरी पोहोचताच नवरी रुममध्ये गेली, एका तासात असं काही झालं की, पाहून नवराच बेशुद्ध पडला

Marriage Fraud : चित्रकूट जनपदमध्ये विवाह पार पडल्यानंतर नवरी सासरी पोहचली. नव्या नवरीने संधी शोधली आणि सोन्या चांदीचे दागिने आणि 30 हजार रुपयांची रोकड घेऊन फरार झाली. त्यामुळे नवऱ्या मुलांकडील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण उत्तरप्रदेशमधील रायपूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. रायपूरामध्ये अशोक नावाच्या व्यक्तीचा विवाह मऊ तालुक्यातील शिकरी या गावच्या निशा नावाच्या मुलीशी पार पडला होता. 18 एप्रिल रोजी हा विवाह पार पडला होता. 

संधी साधून दागिने आणि 30 हजारांची रोकड गायब केली 

नवरा मुलगा अशोक याने पारंपारिक पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडून थाटामाटात विवाह केला होता. त्यानंतर तो नवरीला घेऊन घरी पोहोचला. शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वऱ्हाड परत गेले आणि नवरी मुलीसह दुपारी 3 वाजता घरी पोहोचले. त्यानंतर नवऱ्या मुलाकडिल लोकांनी पुढील विधी परंपरेनुसार सुरु केले. त्याचवेळी संधी साधून दागिने आणि 30 हजारांची रोकड घेऊन नवरी मागच्या दाराने फरार झाली. जेव्हा नवऱ्या मुलाकडील लोक पुढील विधींसाठी नवरी मुलीला भेटण्यास गेले. तेव्हा नवरी फरार झालेली होती. लोकांनी तेथील बॉक्स पाहिला तर सोन्या, चांदीचे दागिने गायब होते. 

चोरट्या नवरीविरोधात पोलीस ठाण्यात धाव 

पीडित नवऱ्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी नवरी मुलीला शोधण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही. पीडित नवऱ्या मुलाने चोरट्या नवरीविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलीसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी नवऱ्या मुलीच्या आई-वडिलांना बोलावून चौकशीला सुरुवात केली आहे. तिने माझ्यासोबत असे का केले? हे मलाच माहिती नाही, असे नवऱ्या मुलाने म्हटलं आहे. 

रात्री संधी दिसताच सोन्या, चांदीचे दागिने घेऊन फरार

विवाह होण्यापूर्वी तिच्याशी बोलणे व्हायचे. तिने मला कधीच काही सांगितले नाही. तिच्याकडून कोणताही फोन कॉल येत नव्हता. जेव्हा नवरा मुलगा कॉल करायचा, तेव्हाच दोघांमध्ये बोलणे होत होते. वऱ्हाड पोहोचताच ती घरच्यांना फोन करुन बोलत बसली होती. रात्री संधी दिसताच सोन्या, चांदीचे दागिने घेऊन ती फरार झाली. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाच तपास करत आहेत. 

लवकरच नवरी मुलीला अटक करण्यात येणार 

याबाबत बोलताना, पोलीस अधिक्षक चक्रपाणी त्रिपाठी म्हणाले, नवऱ्या मुलाकडून दागिन्यांची आणि पैशांची चोरी झाल्याची आणि नवरी फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आम्ही करत आहोत. आम्हाला वाटतय की, नवरी मुलगी तिच्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. सध्यातरी एफआयआर नोंद करण्यात आली असून तपास सुरु आहे. लवकरच नवरी मुलीला अटक करण्यात येणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Narayan Rane on Uddhav Thackeray : शरद पवारांमुळे चुकून मुख्यमंत्री झाला आणि बढाया मारतो, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने