लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक

लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक

ठाणे - राज्यातील अपघाताच्या घटनांची मालिका सुरूच असून दोन दिवसांपूर्वी सांगलीत भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. आता, भिवंडी वाडा रोडवर भीषण अपघात झाला असून सदर अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात मृत पावलेले दोन्ही इसम भिवंडी तालुक्यातील चिंचवली खांडपा या गावचे रहिवासी आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. अपघातीची माहिती मिळताच स्थानिकांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून आरोपी कारचालकास ताब्यात घेतलं आहे. 

भिवंडीहून अंबाडीकडे भरधाव वेगाने येणारी वॅगनार कार ( MH 04KW1746) दुगाड फाटा येथे येताच गाडीला अपघात झाला. येथील रस्त्यावर अगोदर अगोदर कारने एका महिलेला जोरदार धडक दिली. त्यानंतर, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. विशेष, महिलेला धडक दिल्यानंतर कारचालकाने वेगाने कार पुढे नेली. अपघाताच्या भीतीने सदर कार ड्रायव्हरने आपली कार भरधाव वेगाने अंबाडीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अगोदरच अपघात झाल्याने मनात दडपण असलेल्या कारचालकाने येथेही नियंत्रण सुटले. त्यामुळे, वारेट गावच्या हद्दीत सदर कारने लग्न समारंभासाठी जात असलेल्या दोन सख्ख्या भावांना भरधाव वेगात धडक दिली. या भीषण अपघातात दोघेही भाऊ जागीच ठार झाले, या्रकरणी पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

आपली कुठलीही चूक नसताना समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनामुळे दोन सख्ख्या भावांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे, गावकऱ्यांना तीव्र संतापाची भावना असून गावावर शोककळा पसरली आहे. पंढरीनाथ पाटील व गुरुनाथ पाटील या दोन सख्ख्या भावांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. 

हेही वाचा

Akola Crime News : डबल मर्डरच्या घटनेनं अकोला हादरलं! धारदार शस्त्रांनी वार करत दोघांना संपवलं

 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने