धक्कादायक, क्रूर, निष्ठुर! खायला पैसे नाहीत, त्यांची पोटं भरु शकत नाही; पित्यानं सात चिमुकल्यांना यमसदनी धाडलं, पत्नीलाही संपवलं

धक्कादायक, क्रूर, निष्ठुर! खायला पैसे नाहीत, त्यांची पोटं भरु शकत नाही; पित्यानं सात चिमुकल्यांना यमसदनी धाडलं, पत्नीलाही संपवलं

Crime News : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जी वाचून तुम्हीही म्हणाल इतकं क्रूर कसं काय कोणी होऊ शकतं? आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या बापानं आपली सात मुलं आणि पत्नीवर थेट कुऱ्हाडीनं वार केलेत. या घटनेत सात मुलं आणि त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील ही घटना आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सज्जाद खोखर नावाची व्यक्ती आपली मुलं आणि पत्नी यांचं पालनपोषण करु शकत नव्हता. गेल्या अनेक दिवसांपासून तो आर्थिक अडचणींचा सामना करत होता. ज्याला कंटाळून त्यानं आपल्या सात मुलांचा आणि पत्नीचा कुऱ्हाडीनं वार करुन हत्या केली. दरम्यान, पाकिस्तानातून सातत्यानं बातम्या येत आहेत की, देशात औषध आणि अन्न यासारख्या मूलभूत गोष्टींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

पीटीआयच्या वृत्तानुसार, ही घटना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात घडली आहे. आरोपी सज्जाद खोखरनं 7 अल्पवयीन मुलांसह आपल्या पत्नीची हत्या केली. पैशांअभावी आरोपी खूप अस्वस्थ होता. त्यामुळे त्याचे पत्नीसोबत अनेकदा वाद होत होते. या गुन्ह्यानंतर पंजाब पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेत सज्जादची 42 वर्षीय पत्नी कौसर, चार मुली आणि तीन मुलांचा मृत्यू झाला. 

आरोपींनी पोलिसांना काय सांगितलं?

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून आरोपीनं आपला गुन्हा कबुल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीनं पोलिसांना सांगितलं की, तो गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक समस्यांचा सामना करत होता. त्याच्याजवळ कुटुंबाचं पोट भरण्यासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे नाईलाजानं त्यांची हत्या केली, असं आरोपीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. या घटनेनं पाकिस्तानसह संपूर्ण जग हादरलं आहे. ही भीषण घटना म्हणजे, पाकिस्तानमधील परिस्थिती खूप गंभीर झाली आहे. अनेकजण आर्थिक समस्यांचा सामना करत असून पैशाअभावी अनेक कुटुंब उध्वस्त झाल्याचंही बोललं जात आहे. 

पाकिस्तानात 'ढाका ट्रॅजेडी'? इम्रान खान यांच्या पत्रानं खळबळ 

दुसरीकडे, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अदियाला तुरुंगातून सरकारला पत्र लिहिलं असून, त्यात त्यांनी पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. आर्थिक स्थैर्याशिवाय कोणताही देश चालू शकत नाही, असं इम्रान खान यांनी नमूद केलं आहे. पाकिस्तानातील अलीकडच्या राजकीय घडामोडी आणि 1971 ची ढाका शोकांतिका यांची त्यांनी तुलना केली आहे. पाकिस्तानमध्ये 'ढाका ट्रॅजेडी' होण्याची भीती इम्रान खान यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने