अन्न व औषध प्रशासनाची सप्तशृंगी गडावर मोठी कारवाई, तब्बल पाच लाखांचा भेसळयुक्त पेढा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची सप्तशृंगी गडावर मोठी कारवाई, तब्बल पाच लाखांचा भेसळयुक्त पेढा जप्त

Nashik Crime News : सप्तशृंगी गडावरून (Saptashrungi Gad) एक मोठी बातमी समोर येत आहे. अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) विभागाने  सप्तशृंगी गडावर मावा पेढ्याच्या नावाखाली भेसळयुक्त बर्फी विक्री करणाऱ्या पाच दुकानदारांवर कारवाई केली आहे. यात तब्बल दोन हजार किलो बनावट मावा पेढा आणि मिठाई जप्त करण्यात आली आहे. यामुळे सप्तशृंगी गडावर मोठी खळबळ उडाली आहे. 

अन्न व औषध प्रशासन, कार्यालयातर्फे धार्मिक स्थळांच्या यात्रेच्या ठिकाणी व चैत्रोत्सव 2024 निमित्त यात्रेच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कार्यवाही घेण्याबाबतची मोहीम हाती घेतली आहे. जनतेस दर्जेदार व भेसळीरहीत अन्न पदार्थ मिळवेत या करीता अन्न व औषध प्रशासन हे जागरुक आहे. 

सप्तशृंगी गडावर भेसळयुक्त पेढ्याची विक्री

त्याचाच भाग म्हणून  प्रशासनाद्वारे त्र्यंबकेश्वरनंतर जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वणी येथील सप्तश्रृंगगड येथे अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, गोपाल कासार, प्रमोद पाटील, उमेश सूर्यवंशी, अ. उ. रासकर यांनी अचानक छापे टाकून तपासणी केली. सप्तश्रृंगगडाच्या रोपवे संकुल परिसरात ग्राहकांची दिशाभूल करून मावा पेढे, कंदीपेढे, मलाई पेढे व कलाकंद पेढे हे दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केले असल्याचे भासवून हलवा, कलाकंद, स्पेशल बर्फी व इतर तत्सम पदार्थ विकत असल्याचे आढळून आले.

पाच लाखांचा भेसळयुक्त मिठाई जप्त 

या अन्नपुरवठा निरीक्षक अधिकाऱ्यांनी अभिषेक पेढा सेंटर येथे 200 किलो पेढा व इतर मिलावटी साहित्य जप्त केले आहे. त्याची किंमत 64 हजार 200 रुपये आहे. मयुरी पेढा सेंटर येथे 298 किलो पेढा याची किंमत 2 लाख 69 हजार 400 रुपये आहे. मयूर पेढा सेंटर येथे 53 किलो माल जप्त केला आहे. त्याची किंमत 16 हजार 500 रुपये आहे. भगवती पेढा सेंटर येथे 592 किलो माल जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत 1 लाख 77 हजार 600 रुपये आहे. मे. भगवती पेढा सेंटर येथे 187 किलो मला जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत 56 हजार 100 रुपये आहे. असा एकूण 1944 किलो भेसळयुक्त पेढा, मलई पेढा नष्ट करण्यात आला आहे. या भेसळयुक्त पेढ्याची किंमत 5 लाख 83 हजार 800 रुपये आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांवर पत्नीचा गंभीर आरोप, हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Nagpur News : नागपूरमध्ये भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या टेबलवरचं मशीन उचलून आपटलं

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने