Beed Crime News : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाकडून आपल्याच पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला; बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल

Beed Crime News : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाकडून आपल्याच पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला; बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल

Beed Crime News : बीड (Beed) जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या (Shinde Group) उपजिल्हाप्रमुखावर प्राणघात हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या घटनेत उपजिल्हाप्रमुख गंभीर जखमी झाला होता. त्यांच्या पायाला आणि डोक्यावर मारहाण करण्यात आली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघात हल्ला करणाऱ्या आरोपीमध्ये शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखचं मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. गावातील ग्रामपंचायत निवडणूकीत (Gram Panchayat Election) लावण्यात आलेल्या बॅनरवरून दोन गटात वाद झाला होता, याच वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखासह बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर दहा ते बारा जणांनी धारदार शस्त्र आणि रॉडने प्राणघात हल्ला केला होता. याच हल्ल्याप्रकरणी ज्ञानेश्वर खांडे यांच्या फिर्यादीवरून बीडचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह बारा जणांवर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळस जवळा या गावातील ग्रामपंचायत निवडणूक बॅनरवरून गावात दोन गटांमध्ये वाद झाला होता. याच वादातून कुंडलिक खांडे यांनी ज्ञानेश्वर खांडे यांना कट रचून मारहाण केल्याचा आरोप ज्ञानेश्वर खांडे यांनी केला आहे.

पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु...

ज्ञानेश्वर खांडे हे या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले होते, यामध्ये त्यांच्या पायांना आणि डोक्याला मोठी दुखापत झाल्याने त्यांना पुण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. पुण्यातूनच बीड ग्रामीण पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह इतर बारा जणांवर कटरचून हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार प्रकाश सोळंकेंच्या स्वीय सहायकाला भररस्त्यात मारहाण

शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघात हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्वीय सहायकाला भर रस्त्यात एका तरुणाने बेदम मारहाण केली आहे. माजलगावच्या जाळपोळीत आमची नावं विनाकारण का गोवली? असा जाब विचारत आमदार सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांना मारहाण करण्यात आली आहे. माजलगावातील रंगोली कॉर्नरवर ही मारहाण करण्यात आली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष असलेले अरूण राऊत यांचे पुतणे अजयसिंह राऊत यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'माझे नाव या जाळपोळीत विनाकारण का गोवले? माझ्यावर गुन्हा दाखल करतो का? मी जाळपोळीत होतो तरी का?' असे म्हणत सलूनमध्ये शेवींग करत असलेल्या महादू सोळंकेंना बाहेर ओढत आणून मारहाण करण्यात आली आहे. माजलगावात भर रस्त्यात सुरु असलेली मारहाण पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती आणि याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Beed Lok Sabha : बजरंग सोनवणेंना उमेदवारी जाहीर होताच ज्योती मेटेंचा मोठा निर्णय, कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर स्पष्टच सांगून टाकले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने