Ballarsha Crime : बल्लारपूर येथे लोको पायलटची दुचाकी आणि मोबाईल चोरी

Ballarsha Crime : बल्लारपूर येथे लोको पायलटची दुचाकी आणि मोबाईल चोरी

 Ballarsha crime बल्लारपूर :-  शहरातील बालाजी वार्ड येथील आझाद अपार्टमेंट मधील घरातून मोबाईल आणि पार्किंगमध्ये ठेवलेली दुचाकी चोरीस गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Crime


       सहाय्यक लोको पायलट अरविंद वरखडे वय 32 वर्ष हे २६ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता आपली ड्यूटी करून बल्लारशाह रेल्वे स्थानकातून त्यांच्या काळ्या हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी क्र. सीजी ०४ एम ९६५४  वरून बालाजी वार्ड आझाद अपार्टमेंट येथील त्यांच्या निवासस्थानी आले.  रात्री वरखडे हे जेवण करून झोपले होते. Ballarsha crime



मात्र आज सकाळी झोपेतून उठल्यानंतर जवळच ठेवलेला १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व मोटारसायकलची चावी सापडली नसल्याचे दिसले. लगेच खाली उतरल्यानंतर पार्किंगमधून २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेल्याचे दिसले. Ballarsha crime



 त्यामुळे शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता कोणालाच माहिती नव्हती. अखेर आज शनिवारी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक काँक्रिडवार तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने