Chandrapur Tobacco Smugglers : सुगंधित तंबाखू तस्कर जयसुख ठक्कर व महेश गुप्ता वर गुन्हे दाखल

Chandrapur Tobacco Smugglers : सुगंधित तंबाखू तस्कर जयसुख ठक्कर व महेश गुप्ता वर गुन्हे दाखल

 Chandrapur Tobacco Smugglers 29 एप्रिलला रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एका घरी सुगंधित तंबाखूचा साठा लपवून ठेवला आहे.

Prohibited tobacco



माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेकोली जीएम बंगल्याच्या मागील भागास महेश ध्रुवप्रसाद गुप्ता याच्या घरी व किरायाच्या रूम वर धाड मारली असता त्याठिकाणी सुगंधित तंबाखू, मजा 108 सुगंधित तंबाखू असा एकूण 2 लाख 14 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. Chandrapur Tobacco Smugglers



आरोपी महेश गुप्ता याला सदर मालाबाबत विचारणा केली असता तो माल बल्लारपूर येथील जयसुख ठक्कर यांच्याकडून आणला असल्याचे सांगितले. Chandrapur Tobacco Smugglers


स्थानिक गुन्हे शाखेने अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अंतर्गत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये महेश गुप्ता व जयसुख ठक्कर यांच्यावर गुन्हा दाखल केला. Chandrapur Tobacco Smugglers


सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, किशोर वैरागडे, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे यांनी केली अशी माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने 30 एप्रिलला दुपारी 3.30 वाजता दिली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने