Wardha News : भूसंपादन विभागातील अपहार प्रकरणात सहा जणांना अटक; अडीच कोटीहून अधिक रुपयांच्या शासकीय रकमेवर मारला होता डल्ला

Wardha News : भूसंपादन विभागातील अपहार प्रकरणात सहा जणांना अटक; अडीच कोटीहून अधिक रुपयांच्या शासकीय रकमेवर मारला होता डल्ला

Wardha News वर्ध्यात लघुसिंचन व कालवे भूसंपादन विभागात झालेल्या तब्बल 2 कोटी 64 लाख 13 हजार 735 रुपयांच्या अपहार प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या अपहार प्रकरणात तत्कालीन उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा (Wardha News) दाखल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.

यात आता आर्थिक गुन्हे शाखेने उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांना अखेर 12 दिवसांनंतर (Wardha Police) अटक केली आहे. भूधारकांच्या नावे बनावट खाते उघडून शासनाला कोट्यांवधीचा चुना लावल्या प्रकरणी त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आता या कालावधी मध्ये कोणते नवे खुलासे आणि आणखी काही नावे पुढे येतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

भूसंपादन विभागातील अपहार प्रकरणात सहा जणांना अटक

तत्कालीन भूसंपादन अधिकारी तथा परभणीच्या उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी बोगस आणि खोटे कागदपत्र तयार करत आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यात बनावट लाभार्थी दाखवून सूर्यवंशी यांनी वर्ध्यातील एका एजंटला हाताशी धरून आणि दोन महिला सहकारी पतसंस्थांशी संगनमत करून तब्बल 2 कोटी 64 लाख 13 हजार 735 रुपयांच्या शासकीय रक्कम वळविण्यात आली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यावर सूर्यवंशी विरोधात शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून स्वाती सूर्यवंशी या फरार झाल्या होत्या. अखेर 12 दिवसांनंतर पोलिसांनी त्यांना गुरुवारी हिंगोलीतील एका फार्म हाऊस मधून ताब्यात घेतले. तर या प्रकरणातील एजंट असलेल्या  नितेश येसनकर याला 29 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्याला 9 मार्च पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

अडीच कोटीहून अधिक रुपयांच्या शासकीय रकमेवर मारला होता डल्ला

वर्ध्याच्या भूसंपादन विभागात झालेल्या या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे पुढे सरकल्या नंतर पोलिसांनी या प्रकरणी आणखी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.  त्यामुळे आता या प्रकरणातील संशयित आरोपींची संख्या सहा झाली आहे. यात एजंट नीतेश येसनकर (रा. पुलगाव) याच्यासह निशांत किटे (रा. पुलगाव), प्रफुल्ल देवढे (रा. अंदोरी), नितीन बाबूराव कुथे (रा. पुलगाव)आणि आकाश सुरेश शहाकार (रा. खर्डा शिरपूर) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अटकेत असल्याने आणखी काही जण गळाला लागण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत असून पोलीस त्या दिशेने अधिक तपास करत आहे. तर उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या हिंगोली येथील बंगल्यावर झडती दरम्यान 3 लाख 59 हजार रुपये रोख आणि 1 लाख 40 हजार रुपयांचे दागिने देखील आढळून आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने