Pune Drugs Racket : पुणे ड्रग्स प्रकरणात मास्टरमाईंड संदिप धुनियाच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री; सोमनच्या नावाने संदिपकडे सिम कार्ड, दोघं मिळून चालवायचे ड्रग्स रॅकेट?

Pune Drugs Racket : पुणे ड्रग्स प्रकरणात मास्टरमाईंड संदिप धुनियाच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री; सोमनच्या नावाने संदिपकडे सिम कार्ड, दोघं मिळून चालवायचे ड्रग्स रॅकेट?

पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून  (Pune Drugs)  ड्रग्स प्रकरणाची चांगलीच चर्चा  (Pune Crime News)  सुरु आहे. देशातील सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेटचा  (Pune Drug Racket Bust) खुलासा पुणे पोलिसांनी केल्यानंतर आता पुणे पोलिसांकडून आरोपींची आणि या संपूर्ण प्रकरणाचे पाळेमुळे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. यातच या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या संदीप धुनियाच्या प्रेयसीचा ड्रग्स तस्करी प्रकरणात समावेश असण्याची शक्यता आहे. संदीपची प्रेयसी सोनम पंडितची पुणे पोलिसांनी चौकशी केली आहे. 

सोनम पंडित ही ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंड संदीप धुनियाची प्रेयसी आहे. संदीपची प्रेयसी सोनम पंडित हिला पुणे पोलिसांनी बिहारमधील पूर्णियात जाऊन नोटीस दिली होती. पोलिस तपास करताना संदीपने सोनमच्या नावाने काही मोबाईल सीमकार्ड घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे आता तिचीदेखील कसून चौकशी करण्यात येणार आहे. संदीप आणि सोनम यांनी पुण्यात भाडेतत्त्वावर एक फ्लॅट घेतला होता, असंदेखील समोर आलं आहे. संदिप पुण्यात आल्यावर सोनमकडे राहायचा अशी माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे. 

सोनमने काय केलं? कोणाला मदत केली?

पुणे गुन्हे शाखेने ड्रग्सची आतापर्यंतची  सर्वात मोठी कारवाई केली. तब्बल 4000 कोटींचं ड्रग्ज पुण्यात जप्त करण्यात आलं होतं. याच ड्रग्स रॅकेटच्या मास्टर माईंडचं नाव समोर आलं. संदीप उर्फ सनी धुनिया असं त्याचं नाव आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याने नेपाळमार्गे कुवेतला पळाला आहे. त्याच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट असून त्याला नेपाळमध्ये या प्रकारचा कारखाना उभारायचा होता, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. मात्र यात आता प्रेयसीचं नाव समोर आलं आहे.  या संपूर्ण प्रकरणात सोनमने काय केलं? कोणाला मदत केली? याचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

कोण आहे संदीप धुनिया ?

पुणे पोलिसांनी आतापर्यंतच सगळ्यात मोठं ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर त्याच्या मास्टरमाईंडचा शोध घेतला. पुणे पोलिसांच्या हाती या मास्टरमाईंडचा म्हणजेच संदीप उर्फ सनी धुनियाचा फोटो हाती लागला आहे. तो मुळचा पाटण्याचा आहे. 2016 मध्ये संदीप धुनियाला महसुल गुप्तचर संचलानालयाने केलेल्या कारवाईत अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून साधारण 350 किलो एमडी ड्रग्स देखील जप्त करण्यात आले होते. ही कारवाई देखील कुरकुंभ एमआयडीसीत करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तो अॅक्टिव्ह असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात या पूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी वैभव माने आणि हैदर या दोघांच्या संपर्कात होते. येरवडा जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा हे रॅकेट सुरु केलं. सध्या सनी त्याच्या कुटुंबियांबरोबर लंडनला राहतो.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात ईडीची उडी; आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागवली!

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने