Nashik : भाच्यानेच काढला मामीचा काटा! नाशिकमधील महिलेच्या हत्येचा अखेर उलगडा

Nashik : भाच्यानेच काढला मामीचा काटा! नाशिकमधील महिलेच्या हत्येचा अखेर उलगडा

Nashik Crime News नाशिक : एकलहरे रोड (Eklahare Road) येथे पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीची हत्या करण्यात आली होती. या हत्येची उकल करण्यात नाशिकरोड पोलिसांना (Nashik Road Police) यश आले आहे. अनैतिक संबधातून भाच्यानेच मामीचा काटा काढल्याचे समोर आले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाणीपुरी विक्रेता सुदाम रामसिंग बनेरिया (35, रा. सामनगाव, एकलहरा रोड, नाशिकरोड) हा पत्नी व भाच्यासमवेत एकलहरा येथे राहतो. अज्ञात इसमांनी घरात प्रवेश करून त्याच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करत तिचा खून केल्याची भाच्यावर हल्ला केल्याची फिर्याद दिली होती. हा प्रकार संशयास्पद वाटत असल्याने त्यादृष्टीने नाशिकरोड पोलिसांनी तपास सुरू केला होता.

भाच्याने दोघांवर हल्ला झाल्याचा रचला बनाव

क्रांती बनेरिया या महिलेचे तिचा भाचा अभिषेकसमवेत अनैतिक संबंध होते. काल दुपारी दोघांमध्ये किरकोळ वाद झाले होते. या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. त्यानंतर अभिषेकने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने मामीवर वार केले. यामुळे मामीचा मृत्यू झाला. त्यानंतर अभिषेकने स्वत:च्या गळ्यावर चाकू मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत दोघांवर हल्ला झाल्याचा बनाव केला होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. 

भाच्यानेच हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड 

महिलेची हत्या प्रेम प्रकरण, अनैतिक संबंधातून की अन्य कारणातून झाली. याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व दोघांच्या फोन रेकॉर्डवरून माहिती मिळवली. मिळालेल्या माहितीच्या आधारे ही हत्या भाच्यानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र अभिषेकच्या गळ्यावर गंभीर जखम असल्याने तो बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. पोलिसांच्या तपासात भाच्याने केलेला बनाव उघड झाला असून, या खुनाचे गूढ उकलण्यात यश आले आहे.

मालेगावी विधीसंघर्षित मुलाने खेळताना चिमुकल्याला फेकले पाण्यात

मालेगाव (Malegaon) येथील दातारनगर (Datarnagar) भागात राहणारे चार लहान मुले विधिसंघर्षित तेरा वर्षीय मुलाबरोबर खेळत होते. ही मुले खेळत असताना सांडपाण्याच्या डबक्याजवळ गेली. काही वेळ येथे ही बालके घुटमळली. यानंतर विधीसंघर्षित मुलाने एका चिमुकल्याला उचलून सांडपाण्याच्या डबक्यात फेकून दिले. या घटनेत साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा नाका-तोंडात पाणी गेल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विधीसंघर्षित मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Rohit Pawar : मोठी बातमी : रोहित पवारांना ED चा सर्वात मोठा झटका, बारामती अॅग्रोने खरेदी केलेला कारखाना जप्त!

'कशाला सिलिंडरचे दर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कमी केल्याच्या बोंबा मारता?'; चंद्रशेखर बावनकुळेंचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने