Malegaon : साडेतीन वर्षाच्या बालकाला विधीसंघर्षित मुलानं फेकलं सांडपाण्यात, नाका-तोंडात पाणी गेल्याने दुर्दैवी अंत

Malegaon : साडेतीन वर्षाच्या बालकाला विधीसंघर्षित मुलानं फेकलं सांडपाण्यात, नाका-तोंडात पाणी गेल्याने दुर्दैवी अंत

Malegaon News मालेगाव : साडेतीन वर्षाच्या निष्पाप बालकाला एका तेरा वर्षीय मुलाने साठलेल्या सांडपाण्यात फेकून दिल्याने निष्पाप बालकाचा नाका तोंडात पाणी जाऊन दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना मालेगावच्या (Malegaon) दातारनगर भागात घडली. या मुलाला पाण्यात फेकून दिल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

हस्सान मलिक मुदस्सीर हुसेन असे मृत मुलाचे नाव आहे. हलवाई मशीद परिसरातील यंत्रमाग कारखान्याजवळ हस्सान त्याच्या मित्रांसोबत खेळत असतांना त्या ठिकाणी एक टोपी घातलेला १३ वर्षाचा विधी संघर्षित मुलगा आला आणि त्याने हस्सानला उचलून घेतले व सांडपाण्यात फेकून दिले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

विधीसंघर्षित मुलाने खेळताना चिमुकल्याला फेकले पाण्यात

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दातारनगर (Datarnagar) भागात राहणारे चार लहान मुले विधिसंघर्षित तेरा वर्षीय मुलाबरोबर खेळत होती. खेळत असताना ही मुले सांडपाण्याच्या डबक्याजवळ गेली. काही वेळ येथे ही बालके घुटमळली. यानंतर संशयित तेरा वर्षीय टोपी घातलेल्या मुलाने हस्सान मलिक मुदस्सीर हुसेन (रा. दातारनगर, रमजानपुरा) याला उचलून सांडपाण्याच्या डबक्यात फेकून दिले. यानंतर तो मुलगा पळून गेला. 

सांडपाण्यात बुडून चिमुलक्याचा मृत्यू

यादरम्यान एक लहान मुलाने पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याचा पाय फसल्याने तो पुन्हा काठावर आला. याच कालावधीत सांडपाण्यात बुडून या चिमुलक्याचा मृत्यू झाला. या घटनेची वाच्चता होताच बालकाच्या कुटुंबियांनी माजी नगरसेवक शेख खालीद हाजी (Shaikh Khalid Haji) यांच्या सूचनेवरुन सांडपाण्याच्या डबक्याजवळ, कारखान्यात व अन्यत्र सीसीटीव्ही (CCTV) आहे का? याची चौकशी करण्यास सांगितले. त्यावेळी कारखान्याचा सीसीटीव्ही तपासला असता ही घटना निदर्शनास आली. 

विधीसंघर्षित मुलाविरोधात गुन्हा दाखल 

पोलिसांना (Police) माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मयत बालकाचा मृतदेह पाण्यातून काढत पंचनामा केला. सामान्य रुग्णालयात (Hospital) शवविच्छेदन झाल्यानंतर अत्यंत शोकाकूल वातावरणात कब्रस्थान येथे दफनविधी करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेसंदर्भात पवारवाडी पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व उर्वरित बालकांकडून माहिती घेऊन तपास करीत आहेत. या घटनेचा सहायक पोलीस निरिक्षक पवार तपास करीत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

मालेगावात लॉन्समध्ये शिरला बिबट्या, चिमुकल्याने प्रसंगावधान दाखवत खोलीत केले जेरबंद

मालेगाव पॉवर कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात नागरिक आक्रमक, मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने