Dhule News : धारदार शस्त्राने वार करत 28 वर्षीय युवकाची हत्या, धुळ्यातील धक्कादायक घटना

Dhule News : धारदार शस्त्राने वार करत 28 वर्षीय युवकाची हत्या, धुळ्यातील धक्कादायक घटना

Dhule Crime News धुळे : मागील भांडणाच्या कारणातून धुळे (Dhule Crime News) शहरातील सहजीवन नगरात झालेल्या वादात 28 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यात या तरुणाचा मृत्यू झाला असून अमोल गुलदगडे असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात (Dhule Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील सहजीवन नगरात राहणारा अमोल गुलदगडे हा तरुण अवधान टोल नाका येथे पेट्रोलिंग गाडीवर ड्युटीला असून याच भागात राहणारे हर्षल मेढे, आदित्य मेढे व त्याचे वडील राजू मेढे हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. काल सायंकाळी छोरीया नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट टूर्नामेंट पाहण्यासाठी अमोल गुलदगडे याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रांसोबत मॅच पाहण्यासाठी गेला होता. 

तरुणाला पाच जणांकडून मारहाण 

रात्री बारा वाजेच्या सुमारास मॅच बघून ऋषिकेश आणि त्याचे सर्व मित्र सहजीवन नगर येथील महादेव मंदिराजवळ आले असता पंधरा ते वीस मिनिटात ऋषीकेशला जोरजोरात शिवीगाळ करण्याचा आवाज ऐकू आला असता या ठिकाणी त्याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रांसोबत झालेला प्रकार पाहण्यासाठी पळाला असता त्याला अमोलला मारून टाका असा आवाज ऐकू आला. यावेळी त्यांनी या ठिकाणी जाऊन पाहिले असता आदित्य मेढे, हर्षल मेढे, राजू मेढे, जयेश उर्फ गोलू धापे आणि गुणवंत सोनवणे हे अमोलला मारहाण करीत होते. 

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

आदित्य मेढे याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने अमोलच्या गळ्यावर वार केले असता तो आता रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला. यावेळी त्याला त्याचा भाऊ ऋषिकेश आणि त्याच्या मित्रांनी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी (Doctor) त्याला मृत घोषित केले. मागील भांडणाच्या कारणावरून यांनी केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या

Majha Maharashtra Majha Vision 2024 : 'ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले त्या सर्वांची पारदर्शकपणे चौकशी करा'; सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आव्हान

Ajit Pawar on Amol Kolhe : तेव्हाच आम्ही कलाकाराला निवडणुकीत उभं करतो; खा. अमोल कोल्हेंची अजित पवारांनी खिल्ली उडवली!

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने