Crime : सॉरी बाबा.. मी JEE करू शकत नाही... सुसाईड नोट लिहत विद्यार्थ्याची आत्महत्या, राजस्थानच्या कोटामधील सहावी घटना

Crime : सॉरी बाबा.. मी JEE करू शकत नाही... सुसाईड नोट लिहत विद्यार्थ्याची आत्महत्या, राजस्थानच्या कोटामधील सहावी घटना

Rajasthan Crime : राजस्थानमधील कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं सत्र थांबत नाहीय. महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) पहाटे कोटा येथून आणखी एक वाईट बातमी मिळाली आहे. गुरुवारी एका विद्यार्थ्याने कीटकनाशक औषध खात आत्महत्या केली. अभिषेक कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. अभिषेक बिहारच्या भागलपूरचा रहिवासी होता आणि कोटा येथे जेईई मेनची तयारी करत होता.

 

आत्महत्येची ही सहावी घटना

राजस्थान पोलिस आणि प्रशासनाच्या प्रयत्नांनंतरही कोटामधून अशा धक्कादायक बातम्यांच्या ओघ थांबत नाहीय. परीक्षा आणि कामाच्या दबावामुळे कोटा येथे गुरुवारी आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. महाशिवरात्रीच्या दिवशी जेईई शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. विद्यार्थ्याच्या खोलीतून सुसाईड नोटही सापडली आहे. कोटा येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ही सहावी घटना आहे. गेल्या वर्षी 29 मुलांनी आत्महत्या केल्या होत्या. कोचिंगचा विद्यार्थी अभिषेक कुमार हा भागलपूर, बिहारचा रहिवासी होता. एका खाजगी कोचिंग संस्थेतून जेईई मेनची तयारी करत होता. हा विद्यार्थी गेल्या एक वर्षापासून कोटा येथील विज्ञान नगर पोलीस स्टेशन परिसरात तो पीजीमध्ये राहत होता. मृत विद्यार्थी अभिषेक याने कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली. विद्यार्थ्याच्या खोलीतून पोलिसांना सल्फा कीटकनाशकची बाटली सापडली आहे.

 

'सॉरी पप्पा, मी जेईई करू शकत नाही'

पोलिसांनी कोचिंग इन्स्टिट्यूटमधून चौकशी केली असता, अभिषेक 29 जानेवारीला पेपर देण्यासाठीही गेला नव्हता. त्यानंतर 19 फेब्रुवारीला त्याचा पेपरही होता, मात्र तोही विद्यार्थी पेपर देण्यासाठी गेला नाही. पोलिसांनी अभिषेकच्या खोलीतून एक सुसाईड नोटही जप्त केली आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, माफ करा बाबा मी जेईई करू शकत नाही. पोलिसांनी मृत विद्यार्थी अभिषेकचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवला असून कुटुंबीयांना माहिती दिली आहे. कुटुंबीय आल्यानंतर अभिषेकच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून पुढील कारवाई केली जाईल.

 

प्रशासनाकडून विविध मोहिमा राबवल्या जात आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात शिक्षणाचे शहर म्हणून ओळखले जाणारे कोटा आता विद्यार्थी आत्महत्येमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी 29 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, तर या वर्षाच्या सुरुवातीलाच 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. मात्र, विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रशासनाकडून विविध मोहिमा राबवल्या जात आहेत. हॉस्टेल आणि पीजी रूममधील पंख्यांमध्ये अँटी हँगिंग उपकरणे बसवली जात आहेत. शहराच्या नवीन एसपी डॉ. अमृता दुहान वसतिगृहात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेत आहेत. वसतिगृह चालक आणि कोचिंग संस्थांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही या वर्षीही कोटा येथील विद्यार्थी आत्महत्येच्या घटना थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.


मनात आत्महत्येचे विचार येत असतील तर..


जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील तर ही एक अतिशय गंभीर बाब आहे. यावेळी तुम्ही भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 18002333330 वर त्वरित संपर्क साधा. तुम्ही टेलिहेल्थ हेल्पलाइन नंबर 1800914416 वर देखील कॉल करू शकता. येथे तुमची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि तज्ज्ञ तुम्हाला या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक सल्ला देतील. 

 

हेही वाचा>>>

Delhi Crime : लग्नघटिका समीप होती, लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाला चाकूने भोसकले, लग्नघरातच अचानक शोककळा पसरली

 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने