BJP and Sharad pawar Group Status War : देवेंद्र फडणवीसांचा स्टेटस ठेवला, भाजप कार्यकर्त्याला शरद पवारांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

BJP and Sharad pawar Group Status War : देवेंद्र फडणवीसांचा स्टेटस ठेवला, भाजप कार्यकर्त्याला शरद पवारांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

BJP and Sharad pawar Group Status War : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा स्टेटस ठेवला म्हणून भाजप कार्यकर्त्याला शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आलीय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा स्टेटस का ठेवला? असं विचारत ही मारहाण करण्यात आली. ही घटना बीड (BEED) जिल्ह्यातील केज तालुक्यात लहुरी गावात घडली. त्यामुळे केज (KEJ) तालुक्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलय. 

कोणाला झाली मारहाण?

लहुरी येथील गणेश चाळक यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे स्टेटस ठेवला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पंडित चाळक आणि तालुकाध्यक्ष असलेले कैलास चाळक यांनी स्टेटस का ठेवला? अशी विचारणा केली. त्यानंतर  गणेश चालक यांना पंडित चाळक आणि तालुकाध्यक्ष असलेले कैलास चाळक  यांना जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये गणेश चाळक गंभीररित्या जखमी झाले आहेत. गणेश चाळक यांच्यावर केजच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आरोपींना तात्काळ अटक करा, भाजपची मागणी 

याप्रकरणी गणेश चाळक यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करणाऱ्या शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Congress List : लोकसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, राहुल गांधींसह भूपेश बघेल लोकसभेच्या रिंगणात, पहिले 39 उमेदवार कोण?

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने