Anil Jaisinghani : कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला न्यायालयाचा दिलासा, अमृता फडणवीस खंडणी प्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट कोर्टाकडून रद्द

Anil Jaisinghani : कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला न्यायालयाचा दिलासा, अमृता फडणवीस खंडणी प्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट कोर्टाकडून रद्द

Anil Jaisinghani Bookie Update : महाराष्ट्रातील दिग्गज नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) फसवणूक प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला (Anil Jaisinghani) मुंबई सत्र न्यायालयाने (Bombay Session Court) दिलासा दिला आहे. सट्टेबाजीच्या प्रकरणी जारी केलेला अजामीनपात्र अटक वॉरंट कोर्टाकडून रद्द करण्यात आलं आहे. जयसिंघानीनं कोर्टात हजेरी लावत हमी दिल्यानंतर न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी हायकोर्टानं बुकी अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर केला आहे.

अनिल जयसिंघानीचं अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द 

अनिल जयसिंघानी याला गेल्या वर्षी गुजरातमधून अटक करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून फरार असणारा अनिल जयसिंघानीला अटक करण्यासाठी विशेष ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. अनिल जयसिंघानी इंटरनेटचा वापर करून अनेकांच्या संपर्कात होता. आरोपीवर विविध राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन ओळख लपवून राहत होता. त्यानंतर मार्च 2023 मध्ये त्याचा अटक करण्यात आली. अनिल जयसिंघानी याच्यासोबत त्याचा ड्रायव्हर आणि त्याचा एक नातेवाईक यालाही अटक करण्यात आली होती. यानंतर हायकोर्टानं बुकी अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आता मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट कोर्टाकडून रद्द करून त्याला दिलासा दिला आहे.

एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न

दरम्यान, अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानीला याआधीच अटक करण्यात आली आहे. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. फॅशन डिझायनर असल्याचं सांगत अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधली, पुस्तकाचे प्रकाशन केले आणि त्यानंतर वडिलांची फसवणूक झाल्याचं सांगत मदत करण्याची मागणी केली होती. त्याबदल्यात एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्नही केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. 

अनिल जयसिंघानीया कोण आहे?

  • उल्हासनगरमधील क्रिकेट बुकी
  • 2010 साली छोटा बुकी म्हणून ओळखला जायचा
  • 2010  साली बेट घेताना पंचतारांकित हॉटेलमध्ये अटकेत
  •  ब्लू बॉय ऑफ मुंबई ओळख असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा जवळचा व्यक्ती
  • जवळचा व्यक्ती मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर सीपी ऑफिसमध्ये वर्दळ वाढली
  • 1995 साली काँग्रेसकडून उल्हासनगर पालिका निवडणूक लढवली
  • 1997 ला पुन्हा काँग्रेसकडून निवडणुक लढली मात्र पराभव झाला
  • 2002  साली राष्ट्रवादीत प्रवेश आणि पालिका निवडणुकीत विजयी
  •  मागील नऊ वर्षापासून फरार, 15 गुन्ह्यांची विविध पोलीस ठाण्यात नोंद

काय आहे प्रकरण?  

एका केसमध्ये मदत करण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या तरुणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील (Mumbai) मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये (Malabar Hill Police Station) 20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला. अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने