Chandrapur Local Crime Branch Raid : स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत दीड लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

Chandrapur Local Crime Branch Raid : स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत दीड लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

चंद्रपूर - chandrapur local crime branch raid पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर लक्ष ठेवत तात्काळ हे धंदे बंद करायला सुरुवात केली आहे.

Prohibited flavored tobacco


पोलीस अधीक्षकांच्या मोहिमेत जिल्ह्यात सुरू असलेला प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा व्यापारावर आता प्रतिबंध करणे सुरू आहे. 


याबाबत पोलीस अधीक्षकांनी कारवाईची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्याकडे सोपविली.


गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने 5 मार्च ला रात्री 9.30 वाजता वडगाव येथील अजय विजय गुंडोजवार यांच्या घरी धाड मारली असता त्याठिकाणी सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. Chandrapur local crime branch raid


या धाडीत हुक्का शिशा तंबाखू, विमल पान मसाला असे विविध प्रतिबंधीत पान मसाला साठा एकूण किंमत 1 लाख 57 हजार 262 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला.

यावेळी बाबूपेठ येथील विलास शेंडे हा आरोपी पसार झाला असल्याची माहिती आहे.

आरोपी गुंडोजवार यांच्यावर अन्न व सुरक्षा मानके कायद्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.


सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने