Crime Storys-A story of crimes that shook the world

शीर्षक नाही

 चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात नवे पोलीस अधीक्षक म्हणून मुमक्का सुदर्शन रुजू झाल्यावर त्यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आज अवैध धंदे बंद असले तरी कोरपना तालुक्यातील चित्र काही औरचं आहे. Police

Chandrapur police


पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर सुद्धा कोरपना तालुक्यात अवैध धंदे जोमात सुरू आहे, पोलीस अवैध धंद्याना अभय तर देत नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाल्यावर पोलीस अधीक्षकांनी थेट स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई बाबत निर्देश दिले.


स्थानिक गुन्हे शाखेने सुगंधित तंबाखूचा साठा पकडला, त्यानंतर महसूल विभागाने रेती माफियावर मोठी कारवाई केली, मात्र कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप एकाडे अजूनही काही ठोस भूमिका घेतलेली नाही अशी माहिती पुढे येत आहे.


कोरपना तालुका हा तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागात असल्याने याठिकाणी अवैध धंद्यांचा चांगला जोर आहे, सट्टा, सुगंधित तंबाखू, जनावर तस्करी, कोळसा असे अनेक अवैध हालचाली या ठिकाणी चालतात मात्र पोलीस यावर काही कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे.


विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक सुदर्शन यांचा आदेश सुद्धा यांनी जुमानला नाही, मात्र lcb ने कारवाई करीत पोलीस अधीक्षकांचा आदेश पाळला.


विशेष बाब म्हणजे ठाणेदार एकाडे विरोधात सुजाण नागरिकाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार सुद्धा केली आहे. येणाऱ्या काळात कोरपना बाबत पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने