Rohit Pawar ED Inquiry: रोहित पवारांची आज तिसऱ्यांदा ईडी चौकशी; पवारांकडून कागदपत्रे सादर केले जाणार

Rohit Pawar ED Inquiry: रोहित पवारांची आज तिसऱ्यांदा ईडी चौकशी; पवारांकडून कागदपत्रे सादर केले जाणार

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची आज पुन्हा ईडी (ED) चौकशी होणार असून, आज काही कागदपत्रे रोहित पवार ईडीकडे जमा करण्याची शक्यता आहे. एका कथित घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांची मागील काही दिवसांपासून चौकशी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील रोहित पवारांची मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी झाली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी शीखर बँक संबंधित आर्थिक घोटाळ्याचा रोहित पवारांवर आरोप आहे. यापूर्वी रोहित पवारांची 24 जानेवारीला 12  तास आणि 1 फेब्रुवारीला 8.30 तास ईडी चौकशी झाली आहे. तर, आज रोहित पवार यांच्याकडून काही कागदपत्र ईडीकडे सादर केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे, आजही ईडीच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर रोहित पवारांना पुन्हा चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे. 

यापूर्वी दोनदा ईडी चौकशी...

मागील काही दिवसांपासून रोहित पवारांची ईडी चौकशी केली जात आहे.  यापूर्वी दोनदा पवारांची चौकशी करण्यात आली आहे. 24 जानेवारी रोजी ईडी ने बारामती ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड मार्फत कन्नड एसएसके औरंगाबाद या बंद साखर कारखान्याच्या खरेदीशी संबंधित चौकशी केली होती. विशेष म्हणजे यावेळी तब्बल रोहित पवारांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. पुढे 1 फेब्रुवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे पुन्हा समन्स बजावण्यात आले. यावेळी देखील रोहित पवारांची साडेआठ तास चौकशी करण्यात आली होती. आता आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा रोहित पवार ईडीच्या चौकशीला सामोर जाणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या ताब्यात गेल्यावर रोहित पवार पहिल्यांदा चौकशीला सामोर जाणार आहेत. 

आजी आजोबा चौकशीच्या वेळी पक्षाच्या कार्यालयात दिवसभर बसून...

रोहित पवारांची पहिल्यांदा म्हणजेच 24 जानेवारी रोजी जेव्हा ईडीकडून चौकशी झाली, त्यावेळी स्वतः शरद पवार दिवसभर पक्ष कार्यालयात बसून होते.  तर, रोहित पवारांच्या दुसऱ्या चौकशी दरम्यान शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार दिवसभर पक्ष कार्यालयात बसून होत्या. सोबतच रोहित पवारांच्या चौकशीला विरोध करत राज्यभरात शरद पवार गटाने आंदोलन केले होते. 

संविधानाला तडा आणण्याचा भाजपचा प्रयत्न

ईडी चौकशीच्या आधी रोहित पवारांनी भाजपवर टीका केली आहे. "गेल्या काही वर्षांत संविधान बाजूला ठेवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. 2014 ते आतापर्यंत संविधानाला तडा आणण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. दबाव टाकून सर्वच खासदार जर भाजपने स्वतःच्या बाजूने केले, तर भविष्यात निवडणूका होतील की नाही याची शंका आहे. 2024 मध्ये भाजपची सत्ता आली तर पुढच्या निवडणूका लागतील याबाबत देखील शंका असल्याचं," रोहित पवार म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

ईडीने मला जेलमध्ये टाकले तरी माझ्या जागी माझं कुटुंब येथून लढेल, कर्जतमध्ये रोहित पवारांचा एल्गार

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने