वाहनाचा कट लागला म्हणून वाद झाला, रागाच्या भरात धाडधाड गोळ्या झाडल्या, यवतमाळ हादरलं

वाहनाचा कट लागला म्हणून वाद झाला, रागाच्या भरात धाडधाड गोळ्या झाडल्या, यवतमाळ हादरलं

Yavatmal News : वाहनाचा कट लागल्याच्या शुल्लक कारणावरुन यवतमाळमध्ये (Yavatmal Crime News) धाडधाड गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रफीक खान असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी (Police News) याप्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मनिष सागर शेंद्रे असे अटक केलेल्या आरोपीचं (Crime News) नाव आहे. मनिष याला मदत करणारे दोन आरोपी फरार आहेत, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  

वाहनाचा कट लागल्याच्या शुल्लक कारणावरुन देशी कट्ट्यातून छातीवर गोळी झाडून युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. यवतमाळच्या कळंब चौकात मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. शादाब खान  (22,रा. तायडे नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर  मनिष सागर शेंद्रे, (रा.पाटीपुरा) याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेय. मनिषचे जोडीदार आचल चंदनखेडे, विक्की उर्फ शुभम गौतम नाकले हे दोघे फरार आहेत. त्या दोघांचाही   शोध शहर पोलीस ठाणे करीत आहे. 

घटना नेमकी कशी घडली ? तेव्हा काय झालं होतं ?

आरोपी मनिष शेंद्रे हा आरटीओ ऑफीस चौकातून कळंब चौक परिसरात त्याच्या मैत्रीणीसोबत जात होता. यातील मृतक शादाब खान उर्फ रफीक खान याच्या वाहनाचा कट लागला. त्यामुळे मनीष शेंद्रे व शादाब खान यांच्यामध्ये वाद झाला. दोघांमध्ये मोठ्याप्रमाणात शिव्यागाळही झाली. या वादानंतर संतापलेल्या मनिष याने घरी जाऊन देशीकट्टा घेउन परत कळंब चौक येथे आला. त्याच्या पाठोपाठ त्याची मैत्रीणसुध्दा आली. तुम्ही मला व माझा मैत्रीणीला शिवीगाळ का केली ? असा असा प्रश्न विचारत वाद घातला. वाद विकोपाला जाऊन मनिष शेंद्रे याने जवळच्या देशीकट्टाने शादाब खान याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर शादाब खान याला उपचारासाठी शासकीय रूग्णालय  येथे भरती करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान शादाब खान याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृतकाचे वडील रफिक खान इनायत खान यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दोन आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी पथक नेमलं आहे. 

आणखी वाचा :

नात्याला काळीमा, अश्लील व्हिडीओ पाहून बहिणीवर अत्याचार, 19 वर्षीय भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आधी चुलतीनं, मग पुतण्यानं गळफास घेत आयुष्य संपवलं, शिरुर हादरलं

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने