Crime Rate : एकाच आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात 2 हत्या

Crime Rate : एकाच आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात 2 हत्या

 Crime story's

गोंडपीपरी -  मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही मुले गावातील शेतकऱ्याकडे मजुरीसाठी कापसाची गाडी भरायला गेली असता झोपेत असलेल्या वेडगाव येथील लता दामोदर धुडसे( वय ४० वर्ष ) यांच्यावर पतीनेच वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना दि.(१५)मध्यरात्री दीड वाजता घडली. Crime rate

Chandrapur district



गावातील शेतकऱ्याकडे मजुरीसाठी मृतक लता धूडसे यांचे दोन्ही मुले कापूस भरण्यासाठी गेली व मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घरी काम आटपून परतले असता त्यांची आई ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली बाजूला कुऱ्हाड देखील होती. मुलांनी वडीलांचा शोध घेतला असता ते कुठेच आढळले नाही. Chandrapur murder


वडिलांनी तर आईची हत्या केली नाही न असा संशय मुलांना आला, पत्नीवर आरोपी दामोधर मारोती धुडसे यांनी कुऱ्हाडीने  वार करून निर्घृणपणे हत्या केल्याचां अंदाज असून घडलेली माहिती गावकऱ्यांनी लाठी पोलिसांना दिली.


 सकाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले.  सध्यातरी आरोपीचा शोध लाठी पोलीस घेत आहे. हत्येचे कारण गुलदस्त्यात असून पोलीस तपास करत आहे.

विशेष म्हणजे या आठवडाभरात चंद्रपूर जिल्ह्यात 2 हत्येच्याया घटना घडल्या आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने