Chandrapur District : एका घरफोडीचा तपास आणि उघडकीस आले 10 घरफोडीचे गुन्हे

Chandrapur District : एका घरफोडीचा तपास आणि उघडकीस आले 10 घरफोडीचे गुन्हे

 Crime news

राजुरा - 13 फेब्रुवारीला राजुरा येथील साखरावाही येथे झालेल्या घरफोडीचा तपास करीत असताना पोलिसांनी 2 आरोपीना अटक केली, आणि तब्बल 10 घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा आरोपीनी केला.

Chandrapur district



14 फेब्रुवारीला फिर्यादी 50 वर्षीय रमेश चरडे यांनी राजुरा पोलीस स्टेशन गाठत फिर्याद नोंदविली की 13 फेब्रुवारीला फिर्यादी व त्याची पत्नी घराला कुलूप लावून शेतात काम करण्यासाठी गेले होते, मात्र जेव्हा दोघे परतले असता घराच्या दाराचे कुलूप तोडून कुणी अज्ञाताने प्रवेश करीत आलमारीच्या लॉकर मध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 11 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला, पोलिसांनी 454 व 380 कलम अंतर्गत गुन्हा नोंद करीत तपास सुरू केला. Rajura crime



घरफोडीच्या गुन्ह्या बाबतीत गंभीर दखल घ्या असे निर्देश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी राजुरा गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते, पोलीस अधीक्षकांच्या आदेशाची अंमलबजावणी पोलिसांनी सुरू केली असता 15 फेब्रुवारीला गोपनीय माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली, की 2 व्यक्ती संशयास्पद स्थितीत परिसरात फिरत आहे, गुन्हे अन्वेषण पथक त्याठिकाणी पोहचले व दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. Burglary case



पोलिसांनी दोघांची चौकशी केली मात्र आधी दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी पोलिसांना सांगितले की याआधी रामपूर, खामोना येथील दोन, माथरा, पांढरपौणि, पवनी, चनाखा, टेम्बुरवाही, सोंडा येथील प्रत्येकी एक असे 10 घरफोडीचा गुन्हा केला. Chandrapur district


आरोपी 40 वर्षीय समारु देवरसिंग निषाद, राहणारा छत्तीसगड हल्ली मुक्काम रामपूर, राजुरा व 27 वर्षीय बलराम दुर्जन निषाद राहणार छत्तीसगड हल्ली मुक्काम महेशनगर, तुकुम चंद्रपूर या दोघांना पोलिसांनी अटक केली.


पोलिसांनी आरोपी कडून विविध घरफोडी गुन्ह्यातील तब्बल 6 लाख 3 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हाके, पोलीस कर्मचारी सुनील गौरकार, किशोर तुमराम, महेश बेलगोडवार, तिरुपती जाधव, रामराव बिंगेवाड, योगेश पिद्दूरकर, खुशाल टेकाम यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने