Nashik Crime News : नाशिकमध्ये जुगार अड्डा उद्ध्वस्त, 29 लाखांचा मुद्देमाल जप्त, 11 जुगारी पोलिसांच्या ताब्यात

Nashik Crime News : नाशिकमध्ये जुगार अड्डा उद्ध्वस्त, 29 लाखांचा मुद्देमाल जप्त, 11 जुगारी पोलिसांच्या ताब्यात

Nashik Crime News नाशिक : मखमलाबाद येथील काकड मळ्यातील (Kakad Mala Makhamalabad) जुगार अड्डा शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने उद्ध्वस्त केला आहे. पोलिसांनी (Nashik Police) 11 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून मोबाईलसह चारचाकी कार असा 29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मखमलाबाद गावातील काकड मळा येथे सुरेश मुरलीधर काकड हा तिरट नावाचा जुगार खेळवित असल्याची माहिती शहर गुन्हेशाखेच्या विशेष शाखेचे उपनिरीक्षक दिलीप सगळे, हवालदार किशोर रोकडे यांना मिळाली होती.  मिळालेल्या माहितीच्या आधारे विशेष पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना काकड मळ्यातील सुरेश काकड त्याच्या घराचे पाठीमागे वॉल  कंपाऊंड जवळ मोकळ्या जागेत जुना चांदशी रोड या ठिकाणी पत्त्याचा जुगार अड्डा सुरू असल्याचे दिसले. त्यानंतर विशेष शाखेने या जागेवर छापा टाकला. 

11 जणांना घेतले ताब्यात 

सुरेश मुरलीधर काकड (51, रा. मानसी महल, संभाजी चौक, मेनरोड, मखमलाबाद नाशिक), स्वप्नील रमेश मानकर (30, रा. मानकर मळा, मखमलाबाद रोड), अनिल जगन्नाथ मानकर (53, रा. राम मंदिराचे समोर, मखमलाबाद), दत्तु किसन सुर्यवंशी (43, रा. एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद), भगवान मोतीराम काकड (40, रा. मखमलाबाद, नाशिक), रविकांत गणपत गामणे (40, रा. कुंभार गल्ली, मखमलाबाद), अक्षय सुनिल काकड (38, रा. मानकर मळा, मखमलाबाद), विश्वनाथ प्रकाश काकड (46, रा. मानकर मळा, मखमलाबाद), प्रकाश देवराम पिंगळे (40, रा. मखमलाबाद), विशाल ज्ञानेश्वर काकड (34, रा. मखमलाबाद), सुनिल रघुनाथ काकड (50, रा. काकड मळा, मखमलाबाद) यांना जुगार अड्ड्यावरून ताब्यात घेतले.

29 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

त्यांच्याकडून 78 हजारांचे मोबाईल, 76 हजार 200 रुपयांची रोकड, 27 लाख 90 हजारांच्या चारचाकी कार, असा एकूण 29 लाख 44 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी बजावली कामगिरी

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, उपनिरीक्षक दिलीप भोई, दिलीप सगळे, किशोर रोकडे, भामरे, डंबाळे, भुषण सोनवणे, योगेश चव्हाण, दिघे, भगवान जाधव, या पथकाने कामगिरी केली आहे. 

आणखी वाचा 

Sanjay Raut : भाजप आणि एमआयएमचे 'मॅच फिक्सिंग'; संजय राऊतांकडून इम्तियाज जलीलांच्या 'त्या' वक्तव्याचा खरपूस समाचार

अध्यादेशाबाबत जरांगेंची दिशाभूल, मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांनाही बगल; संभाजी ब्रिगेडचा आरोप

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने