Nagpur News : उच्छाद मांडणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई; प्रजासत्ताक दिनी 69 वाहने जप्त, तर अडीच लाखांहून अधिक दंड वसूली

Nagpur News : उच्छाद मांडणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई; प्रजासत्ताक दिनी 69 वाहने जप्त, तर अडीच लाखांहून अधिक दंड वसूली

Nagpur News: नागपूर:   प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेषत: दरवर्षी फुटाळा तलाव (Futala) चौपाटी मार्गावर सकाळपासूनच तरुणाईची मोठी गर्दी उसळत असते. त्या निमित्ताने पोलिसांनी आधी पासूनच या परिसरात विशेष पोलीस पथक नेमले होते. परिणामी या परिसरात वाहतुकीचे नियम मोडत उच्छाद मांडणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. 26 जानेवारीला फुटाळा (NagpurNews) परिसरात हुल्लडबाजी करत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 69 दुचाकीस्वारांना पोलिसी हिसका दाखवत त्यांची वाहने जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जवळ जवळ अडीच लाखांहून अधिक रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

69 वाहने जप्त, तर अडीच लाखांहून अधिक दंड वसूली

नागपूरच्या फुटाळा परिसरात धावत्या बाईक आणि कारवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालून भररस्त्यात स्टंटबाजी केल्याप्रकरणी नागपूर वाहतूक पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणात 69 दुचाकीस्वरांवर कारवाई करत वाहने जप्त केली आहे. ज्यामध्ये काही मॉडिफाइड दुचाकींचा देखील समावेश आहे. 

प्रजासत्ताक दिन असो  किंवा मग स्वतंत्रता दिवस, फुटाळा तलाव चौपाटी ही तरुणाईची कायम आवडते ठिकाण राहिले आहे. राष्ट्रीय सणाला या मार्गावर दरवर्षी सकाळपासूनच तरुणाईची मोठी गर्दी उसळत असते. मात्र मधल्या काळात या रस्तावर काही अतिउत्साही तरूणांकडून नियमांचे उल्लंघन करत वाहनांनी स्टंट केल्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करत अशा स्टंटबाजांच्या मुसक्या आवळल्या होत्या. हीच बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलीस आयुक्त शशिकांत सातव यांनी या मार्गावर सर्वच वाहनांना बंदी असल्याचे निर्देश जारी केले होते. तरी देखील काही स्टंटबाज या परिसरात  उच्छाद मांडत असल्याचे निदर्शनात येताच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई 

बुलेट किंवा इतर बाईकच्या माध्यमातून सायलेन्सर मध्ये बदल करत इतरांचे आपल्या कडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न हे स्टंटबाज करत असतात. गेल्या 15 ऑगस्टला देखील अशावर पोलिसांनी कारवाई केलेली होती. त्याचाच परिणाम म्हणून या वेळेला देखील या परिसरात विशेष पोलीस तैनात करण्यात आले होते. ज्या गाड्यांना वेगळ्या आणि आवाज करणारे सायलेन्सर होते, तसेच जे वाहतुकीचे नियम मोडतांना आढळून आले अशावर कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये सर्वाधिक गाड्या या बुलेट आहेत.

या सर्व कारवाई मध्ये चालनची रक्कम भरून घेतल्याशिवाय तसेच मॉडिफाइड  सायलेन्सर बदलून घेतल्याशिवाय कोणतीही गाडी आम्ही सोडणार नसल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत आता पर्यंत 69 दुचाकी जप्त करून त्यांच्याकडून अडीच लाखांहून अधिक रुपायांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने