Crypto Hacking : क्रिप्टोकरन्सीवर हॅकर्सचा डोळा! गेल्या वर्षात हजारो कोटी करन्सी चोरीला; यामागे उत्तर कोरियाचा हात

Crypto Hacking : क्रिप्टोकरन्सीवर हॅकर्सचा डोळा! गेल्या वर्षात हजारो कोटी करन्सी चोरीला; यामागे उत्तर कोरियाचा हात

Crypto Hacking 2023 : सायबर गुन्हेगार (Cyber Crime) गुन्हेगारीसाठी नवनवीन शक्कल लढवताना पाहायला मिळतात. आता हॅकर्सनी (Hackers) क्रिप्टोकरन्सीला (Crypto Currency) लक्ष्य केल्याचं दिसत आहे. सायबर गुन्हेगारांना गेल्या वर्षभरात क्रिप्टोकरन्सीवर डल्ला मारल्याचं पाहायला मिळत आहे. हॅकर्सनी गेल्या वर्षात हजारो कोटी लंपास केले आहेत. बाजारातील चढउतारांदरम्यान, क्रिप्टोकरन्सी ही जगभरातील हॅकर्स आणि सायबर गुन्हेगारांची पहिली पसंती बनल्याचं समोर आलं आहे. गेल्या वर्षभरात जगभरात हजारो कोटी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सी चोरीला गेल्या आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालात ही माहिती समोर आली आहे.

वर्षभरापूर्वीच्या तुलनेत चोरीचे प्रमाण निम्म्यावर

या आठवड्यात Chainalysis च्या अहवालानुसार, 2023 मध्ये सुमारे 1.7 अब्ज डॉलर किमतीची क्रिप्टोकरन्सी चोरीला गेली. भारतीय चलनात हे मूल्य 14,130 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे वर्षभरापूर्वीच्या तुलनेत 2023 मध्ये क्रिप्टोकरन्सी चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. एका वर्षापूर्वीच्या तुलनेत त्यात 54.3 टक्क्यांनी घट झाल्याचं अहवालात दिसून आलं आहे.

उत्तर कोरियाचा सर्वाधिक वाटा

वर्षभरापूर्वीच्या तुलनेत 2023 मध्ये क्रिप्टोकरन्सी चोरीच्या घटना जवळपास निम्म्या झाल्या आहेत, पण घटनांच्या संख्येच्या दृष्टीने त्यात वाढ झाली आहे. 2022 मध्ये क्रिप्टोकरन्सी चोरीची 219 प्रकरणे नोंदवली गेली, तर 2023 मध्ये 231 प्रकरणांची नोंद झाली. गेल्या वर्षी क्रिप्टोकरन्सी चोरीमध्ये उत्तर कोरियाशी संबंधित संस्थांचा सर्वाधिक सहभाग होता. अहवालानुसार, 2023 मध्ये, उत्तर कोरियाच्या संघटनांचा सुमारे 20 प्रकरणांमध्ये सहभाग होता आणि त्यांनी 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या क्रिप्टोकरन्सी चोरी केल्या होत्या.

बिटकॉइनच्या किमती 20 टक्क्यांनी घसरल्या

क्रिप्टो उद्योगातील नवीन वर्षाची सुरुवात काही खास चांगली झाल्याचं दिसत नाही. 2024 मध्ये सर्वात प्रमुख क्रिप्टोकरन्सी Bitcoin, अनेक वर्षांच्या उच्चांकाच्या जवळ सुरू झाली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला बिटकॉईनची किंमत 50 हजार डॉलर्सच्या अगदी जवळ पोहोचली होती. मात्र, त्यानंतर बिटकॉइनच्या किमती सुमारे 20 टक्क्यांनी घसरल्या आहेत.

ईटीएफला 'या' महिन्यात मंजुरी मिळाली

क्रिप्टो उद्योगासाठी हॅकिंग आणि चोरी ही सर्वात मोठी आव्हाने आहेत. अलिकडच्या काळात क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्याचं प्रमाण वाढत असताना हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. क्रिप्टोकरन्सीच्या संस्थात्मक स्वीकृतीच्या मार्गात चोरी आणि हॅकिंग हे सर्वात मोठे अडथळे आहेत. अलीकडेच, बिटकॉइन ईटीएफला अमेरिकेत प्रथमच मान्यता मिळाली आहे. क्रिप्टोकरन्सीच्या मुख्य प्रवाहात स्वीकारण्याच्या मार्गातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

(Disclaimer : ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.) 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

FD Interest Rate : SBI पासून HDFC पर्यंत, करबचत एफडीवर 'या' बँकाकडून सर्वाधिक व्याज

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने