Crime News: पत्नीनंच रचला पतीला संपवण्याचा कट; पाणीपुरीवाल्याच्या 'ब्लाईंड मर्डर मिस्ट्री'चं गूढ अखेर उकललं

Crime News: पत्नीनंच रचला पतीला संपवण्याचा कट; पाणीपुरीवाल्याच्या 'ब्लाईंड मर्डर मिस्ट्री'चं गूढ अखेर उकललं

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर देहाट येथे झालेल्या एका खळबळजनक हत्याकांडात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. तीन दिवसांपूर्वी पाणीपुरीची गाडी चालवणाऱ्याच्या हत्या झाली होती. या हत्येच्या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू होता. पोलिसांच्या तपासादरम्यान जे समोर आलं, ते अत्यंत धक्कादायक होतं. पोलिसांना तपासात अशा काही गोष्टी आढळून आल्या, ज्यामुळे आपोआप संशयाची सुई हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीवर गेली. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलली आणि त्यानंतर जे समोर आलं ते खरंच हादरवणारं होतं. पाणीपुरीवाल्याची हत्या दुसऱ्या, तिसऱ्या कोणीही केलेली नसून त्याच्या पत्नीनं केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पाणीपुरीवाल्याच्या पत्नीनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 

तपासादरम्यान, पोलिसांना पाणीपुरीवाल्याच्या पत्नीवर संशय आला. पोलिसांनी तात्काळ पत्नीला ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर तिनं आपला गुन्हा कबुल केला. या गुन्हात तिच्या प्रियकराचाही सहभाग असल्याचं तिनं पोलीस चौकशीदरम्यान सांगितलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कानपूर देहाटमधील सिकंदरा पोलीस स्टेशन हद्दीतील रसधन गावात घडली. 18 जानेवारीच्या रात्री पाणीपुरीचा स्टॉल बंद करुन घरी परतताना दीपक गुप्ता (भुर्जी) याला कोणीतरी बेदम मारहाण केली. दुसऱ्या दिवशी 19 जानेवारीला त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात आढळून आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, कुटुंबियांना यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी चौकशी दरम्यान, कुटुंबियांकडे दीपकबाबत चौकशी केली, त्यावेळी त्याचं कोणाशीही वैर नसल्याचं सांगितलं. अशा परिस्थितीत त्याचा खून कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला हे कुटुंबीयांना सांगता येत नव्हतं. या हत्येचं गूढ सोडवणं पोलिसांसमोरही मोठं आव्हान होतं. यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. यावेळी पोलिसांना मृताच्या पत्नीवर संशय आला. पोलिसांनी तिचे मोबाईल डिटेल्स मागवले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दीपक गुप्ताची पत्नी कामिनी उर्फ ​​मालती हिच्या मोबाईलवर एका व्यक्तीचे अनेक कॉल येत होते. रेकॉर्ड तपासले असता 18 जानेवारीला त्यांच्यात अनेकदा बोलणं झाल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी कामिनीला ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

कामिनीनं सांगितलं की, तिनं औरैया येथील रहिवासी प्रियकर रवीसोबत दीपकची हत्या केली होती. घटनेच्या रात्री दीपक चाट विकून घरी येत होता. यादरम्यान आरोपींनी पाठीमागून हातोड्यानं वार करून त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. गुन्हा केल्यानंतर कामिनी घरी आली. तिचा प्रियकर तिथून पळून गेला. पोलिसांनी सांगितलं की, मृताची पत्नी कामिनीचे लग्नापूर्वीपासूनच प्रेमसंबंध होते. तिला रवीसोबत लग्न करायचं होतं, मात्र घरच्यांच्या दबावामुळे तिला सहा महिन्यांपूर्वी दीपकसोबत लग्न करावं लागलं. त्यांना साडेचार वर्षांचा मुलगाही आहे. दीपकला कष्ट करून मुलाला चांगले शिक्षण द्यायचं होतं. 

दरम्यान, त्याची पत्नी सतत तिच्या प्रियकराशी फोनवर बोलत असल्याचं त्याला समजलं. त्यानं तिला विरोध केला, पण ती मान्य झाली नाही. रवीलाही राग आला. दोघांनी मिळून या हत्येचा कट रचला. खून केल्यानंतर, त्यांनी हा अपघात असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी झालं. पोलिसांनी अवघ्या 48 तासांत या प्रकरणाचा छडा लावला. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने