Crime News : ठाण्यात बिहारमधून आलेल्या 15 वर्षाच्या मुलीचा 5 लाखात सौदा, आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News : ठाण्यात बिहारमधून आलेल्या 15 वर्षाच्या मुलीचा 5 लाखात सौदा, आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ठाणे : बिहारमधून (Bihar) एका अल्पवयीन मुलीला फसवून मुंबईत (Mumbai) आणण्यात आले. मुंबईत आणून या 15 वर्षीय मुलीचा 5 लाखात सौदा करण्यात आला होता. त्याचवेळी ठाणे गुन्हे शाखा विभागाने कारवाई करत आरोपींना अटक केली. श्रवण कुमार चौधरी वय 26 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तसेच या पिडीत मुलीची सुटका देखील करण्यात आलीये. बिहारच्या  या मुलीला विक्रीसाठी ठाण्यात आणले जाणार असून तिला अनैतिक व्यवसायात अडकविले जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेष विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचला मिळाली. 

बिहारमधून मुंबईत येण्याचं स्वप्न बघणाऱ्या या मुलीला फसवून मुंबईत आणण्यात आल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली. त्याच माहितीच्या आधारे 23 जानेवारी रोजी युनिट 5 च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने सौदा करून विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रवण कुमार याला पकडले. तसेच यामुळे त्या पिडीत मुलीची देखील सुखरुप सुटका झाली. 

परिसरात एकच खळबळ 

मुंबईत अनेकदा मुलींची विक्री करण्याचे प्रकार घडल्याच्या घटना समोर येतात. दरम्यान यामुळे मुलींच्या सुरक्षिततेवर देखील अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. दरम्यान अशीच एक घटना ठाण्यात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. तसेच पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलीची सुटका झाली. दरम्यान आता या मुलीच्या तिच्या घरी अर्थातच बिहारमध्ये परत पाठवण्यात येणार आहे. 

हेही वाचा : 

हृदय पिळवटून टाकणारी घटना, नाकात गेला तुरीचा दाणा, 3 वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने