Chandrapur Crime News : चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची हत्या, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी

Chandrapur Crime News : चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची हत्या, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी

चंद्रपूर : चंद्रपुरात (Chandrapur) ठाकरे गटाच्या (Thackeray Group) युवासेना शहर प्रमुखाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवा वझकर वय 30 वर्ष या युवासेना शहर प्रमुखांची हत्या झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजलीये. तसेच त्यांचा मृतदेह एका मित्राच्या  कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालंय. त्याचवेळी वझरकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि वाहनांची तोडफोड केलीये. 

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस विभाग सतर्क असतानाच ही घटना घडली. त्यामुळे या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील बंदोबस्त वाढवला.  वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तसेच वझकर यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. मित्रासोबत झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच ठाकरे गटाला तातडीने अटक करण्याची मागणी केलीये. दरम्यान या हत्येचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलं नाही. त्यामुळे पोलीस सध्या या घटनेचा सखोल तपास करत आहेत. 

गोंदियामध्ये तरुणाची हत्या

गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना काल 23 जानेवारीच्या मध्यरात्री घडली. बिहार राज्यातून रोजगारासाठी गोंदियात आलेल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना गोंदिया शहरालगत असलेल्या कुडवा येथे घडली होती. ज्यामध्ये चहाच्या टपरीवरील उधारीच्या पैशातून एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बापलेकासह अन्य एकाला ताब्यात घेतले होते.

याशिवाय, 11 जानेवारीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गोंदिया जिल्हा प्रमुख पंकज यादव यांचे छोटे बंधू आणि माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटना ताज्या असतानाच आता परत घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे गुन्हेगारीने जिल्ह्यात परत एकदा डोके वर काढले असल्याचे चित्र आहे. अद्याप या हत्येमागील कारण आणि आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. पोलिसांनी मृतदेह शविच्छेदन करण्याकरिता पाठवला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे. 

हेही वाचा : 

Manoj Jarange : खपाखपा सही केली, दणादणा निघून गेलो, फसवून झोपेतच सही घेतली; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने