Ahmednagar Crime News : धारदार शस्त्राने वार करत शेतकरी तरुणाची हत्या, श्रीगोंदा तालुक्यातील घटना

Ahmednagar Crime News : धारदार शस्त्राने वार करत शेतकरी तरुणाची हत्या, श्रीगोंदा तालुक्यातील घटना

Ahmednagar Crime News : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतकरी तरुणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना घडली आहे.  या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. योगेश शेळके असे मृत तरुणाचे नाव आहे. 

योगेश शेळके (35) हे कोथूळ गावात शेती व्यवसाय करत होते. रात्री तीनच्या सुमारास चार अज्ञात व्यक्ती योगेशच्या घरात घुसल्या होत्या. त्यांनी त्याला मारहाम करतच गळा चिरून त्याची हत्या केली. शेतकरी तरुणाचा खून नेमका कोणी केला? याबाबत अजून स्पष्टोक्ती नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

तोंडाला रुमाल बांधल्याने ओळख पटली नाही

पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली असता हत्या करणाऱ्यांनी तोंडाला रुमाल बांधला असल्याने त्यांची ओळख पटली नाही, असे शेजारील रहिवाशांनी सांगितले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

राहुरी तालुक्यात वकील दाम्पत्याची हत्या

राहुरी तालुक्यातील मनोरी येथील आढाव वकील दाम्पत्य 25 जानेवारीला दोघेही राहुरी कोर्टात गेले. मात्र घरी परतलेच नाही. राजाराम जयवंत आढाव (52) व  मनिषा राजाराम आढाव (42) हे दोघे घरी न आल्याने 26 जानेवारीला राहुरी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. याप्रकरणी सुरुवातीला पाच जणांनी संगनमताने खंडणीसाठी त्यांचे अपहरण केल्याचे समोर आले. मात्र खंडणीसाठी नकार दिल्याने 5 ते 6 तास त्यांचा एका घरात बांधून छळ करण्यात आला. त्यानंतर त्यांच्याच गाडीमध्ये बसवून त्यांना मानोरी गावाच्या बाहेर घेऊन जात रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यात प्लास्टिक पिशव्या घालून त्यांचा त्यांचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

वकील संघटनेचा राज्यभर आंदोलनाचा इशारा

या घटनेनंतर वकील संघटना आक्रमक झाल्या आहेत. वकील संरक्षण कायदा करावा ही मागणी अनेक वर्षांपासून पूर्ण होत नाही व त्यातच अशा प्रकारच्या घटना उघडकीस येत असल्याने नगर जिल्ह्यातील वकील संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 2 तारखेला फडणवीस यांच्या भेटीत वकील संरक्षण कायद्याविषयी मार्ग न निघाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष नरेश गुगळे यांनी दिला.

आणखी वाचा 

Nashik Police : महिला सुरक्षिततेबाबत गुंडाविरोधी पथकाची धडक मोहीम; 12 टवाळखोरांवर कारवाई

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने