आईने केली 4 वर्षीय मुलाची हत्या, मृतदेह सुटकेस मध्ये भरून केला प्रवास

आईने केली 4 वर्षीय मुलाची हत्या, मृतदेह सुटकेस मध्ये भरून केला प्रवास

Shocking crime

बंगळूर - बंगळूरच्या स्टार्ट अप कंपनीच्या सीईओ 39 वर्षीय सूचना सेठ यांनी आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केली, व मृतदेह सुटकेस मध्ये टाकत टॅक्सीने बंगळूर येथे नेला, गोवा पोलिसांच्या माहितीनंतर कर्नाटक पोलिसांनी आरोपी महिलेला मुलाच्या मृतदेहासोबत अटक केली.
India crime




माईंडफुल AI लॅब च्या सूचना सेठ या स्टार्ट कंपनीच्या संस्थापक आहे, 6 जानेवारीला सूचना सेठ आपल्या 4 वर्षीय मुलांसोबत सोल बन्यान ग्रांडे हॉटेलमध्ये गेल्या होत्या, 8 जानेवारीला सेठ यांनी चेक आऊट केले.



त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी रूम साफ करण्यासाठी गेले असता त्याठिकाणी त्यांना रक्ताचे डाग दिसले, त्यांनतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी याबाबत गोवा पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी हॉटेल मधील सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये महिला एकटीच चेक आऊट करताना दिसल्याने सूचना सेठ यांनी मुलाची हत्या केली असा संशय व्यक्त केला.



चेक आऊट करताना गोवा ते बंगळूर दरम्यान सूचना सेठ यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना टॅक्सी बुक करण्यास सांगितले असता कर्मचाऱ्यांनी विमानाने आपण बंगळूर ला जावे असा हट्ट धरला मात्र सूचना यांनी सर्व बाब नाकारली.



पोलिसांनी टॅक्सी चालकाला याबाबत विचारले असता अधिक माहिती मिळाली नाही, पोलिसांनी सूचना यांना मुलांबाबत विचारले असता मुलगा नातेवाईक यांच्याकडे गेला असून त्याचा पत्ता दिला मात्र ती माहिती पूर्णतः खोटी निघाली.



त्यांनतर गोवा पोलिसांनी तात्काळ टॅक्सी चालकाला सम्पर्क साधत टॅक्सी सरळ पोलीस स्टेशनमध्ये नेण्यास सांगितले, टॅक्सी चालकाने चित्रदुर्ग पोलीस स्टेशन गाठले त्याठिकाणी पोलिसांनी सूचना जवळील बॅग तपासली असता त्यामध्ये 4 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला.



सूचना चे 14 वर्षांपूर्वी लग्न झाले होते, 2020 ला सूचना ला मुलगा झाला, त्यांनतर पती-पत्नीमध्ये वाद वाढल्याने दोघांनी घटस्फोट घेतला, न्यायालयाच्या आदेशाने दर रविवारी मुलाला वडिलांशी भेट घेण्यासंदर्भात आदेश दिले, मुलगा वडिलांना भेटतो म्हणून सूचना ला त्या गोष्टीचा राग होता.



मुलगा पतीला न भेटावा यासाठी तिने खूप प्रयत्न केले मात्र काही न झाल्याने अखेर सूचना आपल्या 4 वर्षीय मुलाची हत्या केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने