शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या घरी केली चोरी

शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या घरी केली चोरी

Chandrapur burglary crime

चंद्रपूर - शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीच्या 2 घटनेतील आरोपीना रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून आरोपी जवळून तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


Chandrapur burglary news


17 ऑक्टोम्बर ला जगन्नाथ बाबा नगर येथे राहणारे शिक्षक 42 वर्षीय संदीप श्रीहरी गायकवाड हे सायंकाळी घराला कुलूप लावून दांडिया बघण्यासाठी गेले असता त्यांच्या घरी अज्ञातांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, बेडरूम मध्ये ठेवलेल्या अलमारीचे लॉकर तोडून त्यामधील रोख 2 लाख 53 हजार रुपये चोरून नेले.


18 ऑक्टोम्बरला फिर्यादी शिक्षक संदीप गायकवाड यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदविली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.


22 ऑक्टोम्बर ला शहरातील जयराज नगर निवासी 36 वर्षीय वैभव ब्रिजेश सिंग हे रात्री 9 वाजता देव दर्शन करायला गेले होते, रात्री 10 वाजता ते परतल्यावर त्यांच्या घरातील सामान अस्तव्यस्त स्थितीत होते, अज्ञातांनी अलमारीचे लॉकर तोडत त्यामधील ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने एकूण किंमत 8 लाख 74 हजार 160 चोरून नेले, आरोपींनी 1 तासात ही चोरी केली होती.


23 ऑक्टोम्बर ला रामनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी वैभव सिंग यांनी याबाबत तक्रार दिली, पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.


रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला, दोन्ही घटनेतील परिसरात जाऊन पाहणी केली, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, आरोपी हे नागपूर च्या रवाना झाले होते, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी 2 घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे कबूल केले.


या गुन्ह्यात पोलिसांनी शिक्षण घेत असलेला 22 वर्षीय युवक रजनीकांत केशव चानोरे राहणार दिघोरी नागपूर व 37 वर्षीय जितेंद्र उर्फ जितू भाऊराव आगासे राहणार कन्हान जिल्हा नागपूर यांना अटक करण्यात आली.


पोलिसांनी आरोपिकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल क्रमांक MH40CN0590, टोकदार 2 लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर, सोन्या चांदीचे दागिने व गुन्ह्यातील चोरी गेलेला एकूण 11 लाख 62 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोलीस निरीक्षक लता वाढीवे, गुन्हे शोध पथकातील अधिकारी, कर्मचारी व सायबर सेल ने केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने