चंद्रपुरात रामनगर पोलिसांनी सोन्याची चैन हिसकविणाऱ्या आरोपीला केली अटक

चंद्रपुरात रामनगर पोलिसांनी सोन्याची चैन हिसकविणाऱ्या आरोपीला केली अटक

Chandrapur chain snatcher

चंद्रपूर - दुचाकी वाहनांवर येत अनेक गुन्हेगारांनी महिलेच्या गळ्यातून सोन्याच्या चैन हिसकविण्याचे काम केले आहे मात्र चंद्रपुरात चक्क सायकलवरून महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन हिसकविणाऱ्या आरोपीला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

Chain snatching




11 नोव्हेम्बरला छत्रपती नगर येथील 60 वर्षीय महिला सुनीता कोकुलवार दिवाळी सणाच्या घाईत सकाळी घरासमोर रांगोळी टाकत असताना तोंडावर दुपट्टा बांधलेल्या अज्ञात इसमाने कोकुलवार यांच्या गळ्यात असलेल्या 2 तोळ्यांचा सोन्याचा गोप हिसकविण्याचा प्रयत्न केला, यावेळी दोघांची झटापट झाली असता सोन्याचा गोप चा काही भाग आरोपी व काही भाग कोकुलवार यांच्या हातात आला.



कोकुलवार यांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत आरोपीने तिथून पळ काढला, कोकुलवार यांनी यासंदर्भात रामनगर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केली.


गुन्हा दाखल होताच गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला, घटनास्थळ परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासून बघितले, गुप्त बातमीदार यांच्याकडून काही माहिती घेतली असता गाडगेबाबा चौकात राहणाऱ्या आरोपी 35 वर्षीय मंगेश वसंता हिंगाने याला अटक करण्यात आली.


आरोपीला ताब्यात घेतल्यावर त्याची कसोशीने चौकशी केली असता ऑक्टोबर महिन्यात मंगेश ने दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेच्या गळ्यातून सोन्याचा गोप हिसकावून पळ काढला होता, आरोपीला अटक करीत त्याच्याजवळून 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


याबाबत अधिक माहिती घेतली असता आरोपी हा कर्जबाजारी व घराचे बांधकाम सुरू असल्याने तो आर्थिक विवंचनेत होता, कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने सदरील गुन्हा केला असा अंदाज आहे. गुन्हा करताना आरोपी सायकलने फेरफटका मारत विविध भागात फिरत होता, गुन्हा करताना तो सायकलचा वापर करीत होता.


सदरील यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोलीस निरीक्षक लता वाढीवे व स्थानिक गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने