बिल पाहिजे तर टक्केवारी लागेल, ग्रामसेवक अडकला लाचेच्या जाळ्यात

बिल पाहिजे तर टक्केवारी लागेल, ग्रामसेवक अडकला लाचेच्या जाळ्यात

Acb trap chandrapur


चंद्रपूर - 15 व्या वित्त आयोगातून वर्ष 21- मध्ये जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत योगा शेडचे बांधकाम करण्यात आले होते, त्याचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवकाने टक्केवारी ची मागणी केली, मात्र या 5 टक्के रकमेसाठी ग्रामसेवक रंगेहात लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला.

Bribe



तक्रारदार हे मौजा उमरी पोतदार येथील रहिवासी असून जिल्हा परिषद अंतर्गत 15 व्या वित्त आयोगातून योगा शेड चे बांधकाम एकूण किंमत 3 लाख 49 हजार 321 रुपयांचे काम पूर्णत्वास आले, त्यानंतर मटेरिअल व साहित्य पुरवठ्याचे 2 लाख 44 हजार 525 रुपयांचे बिल ग्रामसेवक देवानंद गेडाम यांनी काढून दिले होते.


योगा शेड बांधकामाला लागलेला एकूण खर्चावर ग्रामसेवकाने 5 टक्के 17 हजार 500 रुपयांची मागणी तक्रारदाराला केली. तडजोडीअंती 13 हजार रुपये देण्याचे ठरले मात्र तक्रारदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत विभागात तक्रार दिली.



तक्रारीची पडताळणी केल्यावर 6 ऑक्टोबर ला लाचलुचपत विभागाने सापळा रचला, ग्रामपंचायत कार्यालय उमरी पोतदार येथे पंचासमक्ष देवानंद गेडाम यांनी 13 हजारांची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात अटक करण्यात आली.



सदरचा यशस्वी सापळा पोलीस अधिक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, तसेच कार्यालयीन कर्मचारी संदेश वाघमारे, राकेश जांभुळकर, अमोल सिडाम व प्रदीप ताडाम यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने