बल्लारशाह रेल्वे स्टेशन येथे चोरांना पकडले

बल्लारशाह रेल्वे स्टेशन येथे चोरांना पकडले

Railway police रमेश निषाद


बल्लारपूर :- प्रवाशी गाड्यांमधील प्रवाशांचे किमंती ऐवज असलेले लेडीज बॅग, मोबाईल चोरांना पकडण्यात स्थानीक गुन्हे शाखा, लोहमार्ग नागपूर पथकाला यश आले असून चार आरोपींना अटक केले आहे. त्यांच्या कडून 9 लाख रुपये चे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.


Railway crime
स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर ची कारवाई


17/08/2023 रोजी फिर्यादी परमानंद टिकादास खत्री रा. आसमा कॉलनी लाईन नं. डी 7 सेंट्रल गार्डन च्या जवळ साकरी बिलासपुर छ.ग. हे गाडी क. 07255 पटना स्पेशल गाडी ने आपले पत्नीसह कोच क. ए/ 2 बर्थ क. 32,33 वरून प्रवास करीत असतांना रेल्वे स्टेशन बल्लारशाह येणे पूर्वी फिर्यादीची पत्नी टॉयलेट ला गेल्या असता अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे पत्नी टॉयलेट ला गेल्याने त्याचे गैरहजेरीचा फायदा घेवून त्यांची बर्थवर ठेवलेली ब्राउन रंगाची लेडीज बेंग त्यात सोन्याचे दागीने व रोख रूपये 18000/- रू. असा एकूण 4.43,000/- रूपयाचा माल चोरून नेल्याने रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे अप क. 363 / 2023 कलम 379 भा. द. वी. चा गुन्हा दाखल झाले होते.


गुन्हयाचे गांभीर्य बघता पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांनी दिलेल्या सूचनानुसार स्थानीक गुन्हे शाखे तर्फे सदर गुन्हयाचा समांतर तपास  करीत असताना गुप्त माहितगाराव्दारे माहिती मिळाली की, वारंगल, काझीपेठ कडून येणाऱ्या पटना स्पेशल, हिसार एक्स,  चेन्नई जोधपुर एक्स. काझीपेठ दादर एक्स. या गाडयांवर प्रवाशांचे सामान चोरी करणारे चार संशयीत ईसम रेल्वे स्टेशन बल्लारशाह येथे येत आहेत अशा माहितीवरून स्थानीक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर याचे एक पथक तयार करून रेल्वे स्टेशन बल्लारशाह येथे पाठविण्यात आले. 


गुप्त माहितगाराने संशईत इसमाचे वर्णनासह दिलेल्या माहितीचे आधारे संशयीताचा रेल्वे स्टेशन बल्लारशाह परिसरात शोध घेत असताना दिनांक 15/09/2023 रोजी चार संशयीत ईसम मिळून आले. सतीश रामदास चाबूकस्वार वय 32 वर्षे रा. रमाबाई आंबेडकर नगर तिसगाव औरंगाबाद जि. औरंगाबाद, विक्रम सुर्यकांत सुकनगे वय 31 वर्षे, रा. बापशेटवाडी बाराहाळी ता. मुखेड जि. नांदेड, कैलाश गजीराम एरने वय 37 वर्षे रा. आंबेडकर चौक खंडाळा ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर, अरूण मोतीराम दरेकर वय 32 वर्षे, रा. अवधूतवाडी सम्राट नगर गजानन चौक पंचवटी नाशीक असे सांगीतले. चौकशीदरम्यान त्यांचेवर अधिक संशय बळावल्याने त्यांचे सामानाची तपासणी केली असता त्यांचेकडे विविध कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल, एक टॅब, एक ट्रॉली बॅग असा एकूण 1,31,017/- रूपयाचा मुद्देमाल मिळून आला. चौकशीदरम्यान त्यांनी रे.पो.स्टे. वर्धा अप क. 363/ 2023 कलम 379 भादवीचा गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांनी रितसर अटक करून नमुद आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला.


    नमुद आरोपींनी दिलेल्या माहितीवरून सदर गुन्ह्यातील व ईतर गुन्ह्यातील सोन्याचे दागीणे वितळवून तयार केलेली लगड वजन 140 ग्रॅम कि 7,00,000/ रु. तसेच रे पो स्टे नागपूर अप क 1139 / 2023 व रे, पो. स्टे. वर्धा अप क. 411/2023 कलम 379, 34 भा.द.वी मधील व इतर गुन्ह्यातील कंपनीचे एकूण 13 अँड्रॉइड मोबाईल किमत 2.24,000/- रूपये, एक Acer ON 8 T4-82 L TAB किमत 12000/- रू. व ट्रॉली बॅग आतील समानासह किमत 3200 /- रू. असा एकूण 9,24,000 /- रूपयाचा मुद्देमाल नमुद आरोपीकडून हस्तगत करण्यात आला असून नमुद गुन्हयाव्यतीरीक्त उर्वरीत सोन्याची दागीने बनवून केलेली लगड, अँड्रॉइड मोबाईल, टॅब व ट्रॉली बैग मालकांचा शोध घेणे सुरू आहे.


सदरची कार्यवाही डॉ. अक्षय शिंदे, पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपुर, श्रीमती वैशाली शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग नागपुर यांचे मार्गदर्शनात श्री विकास कानपिल्लेवार पोलीस निरीक्षक, स्था.गु. शाखा यांचे सुचनेनुसार स्था.गु शाखेचे पोउपनि प्रविण भिमटे, पो. हवा. महेंद्र मानकर, पो. ना. विनोद खोब्रागडे, पो.ना. नितीन शेंडे, पो.शि. गिरीश राउत, पो.शि. मंगेश तितरमारे रे.पो.स्टे वर्धा येथील सपोनि श्रीमती बोयने पो हवा, विजय मुंजेवार, पो.शि. राकेश वासनीक व पो.शि. संदेश लोणारे तसेच सायबर सेल चे पो.शि. सदीप लहासे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने