चंद्रपूर जिल्ह्यातील या लाचखोरांना 5 वर्षाची शिक्षा

चंद्रपूर जिल्ह्यातील या लाचखोरांना 5 वर्षाची शिक्षा

Acb tras news

चंद्रपूर - वर्ष 2015 मध्ये 5 हजार रुपयांची लाच मगितल्याप्रकरणी वनविभाग तळोधी नागभीड येथील कर्मचाऱ्यांना 5 वर्षाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

Acb conviction chandrapur


18 नोव्हेंबर 2015 मध्ये तक्रारदार योगेंद्र बनसोड यांनी महसूल जागेवर बोल्डर, मुरूम व गिट्टी चे उत्खनन करण्यासाठी लीज मागितली होती त्यासाठी वनविभागाचे नाहरकत प्रमाणपत्र गरजेचे होते.


बनसोड यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय तळोधी येथे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला मात्र वनपाल विठोबा वैरागडे यांनी 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, त्याच रकमेतील 1 हजार रुपयांचा वाटा वनपाल वैरागडे यांनी तक्रारदाराला डेपो चौकीदार जितेंद्र डोरलीकर यांना देण्यास सांगितले, व 1 हजार रुपये लिपिक यशवंत गौरशेट्टीवार यांना दिले.


या लाच प्रकरणाची तक्रारदार बनसोडे यांनी चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली होती, तक्रारीची पडताळणी झाल्यावर तत्कालीन पोलीस निरीक्षक विठ्ठल आचेवार यांनी सापळा रचत तिघांना रंगेहात पकडले.


तिघांवर विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, 8 वर्षे न्यायालयात चाललेल्या या भ्रष्टाचार प्रकरणाच्या सुनावणीत वनपरिक्षेत्र कार्यालयातील तिन्ही लोकसेवकाना विशेष न्यायालयाने तब्बल 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.


नागरिकांचे कामे करण्यासाठी त्यांच्याकडून लाच मागणे हा गुन्हा असताना सुद्धा लोकसेवक आजही गुपचूप पद्धतीने नागरिकांकडून पैसे उकळण्याचे धंदे करतात मात्र चंद्रपूर विशेष न्यायालयाने लाचखोरांना या निर्णयाने चांगलीच चपराक लावली आहे.


सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अधिवक्ता संदीप नागपुरे यांनी लाचखोरांना शिक्षा व्हावी यासाठी प्रचंड मेहनत घेत, युक्तिवाद केला, यासोबत पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले व पोलीस कर्मचारी अरुण हटवार यांनी काम बघितले.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने