तिहेरी हत्याकांडाने हादरली शिर्डी

तिहेरी हत्याकांडाने हादरली शिर्डी

Shirdi triple murder

शिर्डी - शिर्डी येथील सावळीविहीर गावात 20 सप्टेंबरला मध्यरात्री एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली.
Triple murder




कौटुंबिक वादातून जावयाने सासरच्या मंडळींवर धारदार शस्त्राने वार करीत तिघांची हत्या केली तर काहींना जखमी केल्याची माहिती पुढे आली आहे.


आरोपी सुरेश निकम यांचे सावळीविहीर गावातील वर्षा गायकवाड सोबत लग्न झाले होते, लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी सुरेश चा पत्नी व सासरच्या लोकांबरोबर वाद सुरू होता, वादानंतर सुरेश ची पत्नी वर्षा ही माहेरी रहायला गेली होती.



ही बाब सुरेश ला खटकली त्याने 20 सप्टेंबर मध्यरात्री च्या सुमारास सासरी गेला, घरात शिरताच त्याने 24 वर्षीय पत्नी वर्षा, 25 वर्षीय मेव्हणा रोहित गायकवाड व 70 वर्षीय आजी सासू हिराबाई गायकवाड यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत त्यांची हत्या केली.



त्यानंतर सासू, सासरे आणि मेव्हनीवर सुद्धा हल्ला केला या हल्ल्यात तिघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले, घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी सुरेश वर गुन्हा दाखल करीत त्याचा शोध सुरू केला, काही वेळात पोलिसांनी सुरेश निकम ला नाशिक येथून अटक केली.


एका कौटुंबिक वादातून 2 कुटुंब उध्वस्त झाले, या घटनेमुळे शिर्डी पूर्णतः हादरुन गेली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने