लिव्ह इन पार्टनरची हत्या, महिन्याभरानंतर हत्याकांडाचा उलगडा

लिव्ह इन पार्टनरची हत्या, महिन्याभरानंतर हत्याकांडाचा उलगडा

Palghar Live in relationship murder

पालघर - श्रद्धा वॉलकर या तरुणीची लिव्ह इन रिलेशनशिप दरम्यान नृशंस हत्या करण्यात आली होती, त्यानंतर देशात अनेक प्रकरणे उघडकीस आली, मात्र पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यात लिव्ह इन पार्टनर च्या हत्येची घटना उघडकीस आली आहे.

Live in partner murder


कॉस्च्युम डिझायनर असलेल्या मनोहर शुक्ला असे आरोपीचे नाव आहे, मनोहर मेकअप आर्टिस्ट नयना महंत सोबत मागील 5 वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहत होता, नयना ने मनोहर वर लग्नासाठी दबाव टाकला होता, मात्र तो नयना ला उडवाउडवीची उत्तरे देत होता.


कारण मनोहर चे लग्न आधीच झाले होते, लग्नाला नकार मिळाल्याने नयना ने मनोहर विरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती, तक्रार मागे घ्यावी अशी विनंती मनोहर ने नयना ला केली होती.


सदर घटना ही 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान घडली, मनोहर ने नयना ला भेटायला बोलाविले व त्यानंतर तिला पाण्यात बुडवून ठार केले, नयना मृत पावली अशी खात्री झाल्यावर मनोहर व त्याच्या पत्नीने नयना चा मृतदेह सुटकेस मध्ये भरून 150 किलोमीटर दूर गुजरातच्या वलसाड खाडीत फेकून दिला.


12 ऑगस्ट नंतर नयना च्या बहिणीने अनेकदा नयना ची विचारपूस करण्यासाठी सम्पर्क साधला असता नयना चा मोबाईल खराब झाला असल्याची माहिती मनोहर ने दिली, सोशल मीडियावर सुद्धा नयना काही अपडेट करीत नसल्याने नयना च्या बहिणीने 14 ऑगस्ट रोजी नयना हरविल्याची नायगाव पोलिसात तक्रार दिली, दिलेल्या तक्रारीत मनोहर नयना ला ठार मारणार अशी माहिती पूर्वी नयना ने दिली होती, या आधारे पोलिसांनी चौकशीसाठी मनोहर ला ताब्यात घेतले असता संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला.


पोलिसांनी मनोहर व त्याच्या पत्नीला अटक करीत न्यायालयात हजर केले असता दोघांनाही न्यायालयाने 16 सप्टेंबर प्रयत्न पोलीस कोठडी सुनावली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने