चंद्रपूर शहराच्या मध्यभागी महामार्ग पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई

चंद्रपूर शहराच्या मध्यभागी महामार्ग पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई

Chandrapur cattle smuggling

चंद्रपूर - चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरात 21 सप्टेंबर ला सकाळी महामार्ग पोलिसांनी ट्रक मध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.


Cattle smuggling




चंद्रपूर जिल्ह्यातून तेलंगणा येथे कत्तलीसाठी जनावरांना नेण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने या ठिकाणाहून अनेकदा ट्रक द्वारे जनावरांची वाहतूक होत असते, 21 सप्टेंबरला चंद्रपूर महामार्ग पोलिसांचे पथक सकाळी 8.30 वाजता पेट्रोलिंग करीत असताना बंगाली कॅम्प परिसरात ट्रक क्रमांक Mh 40 BL0065 चा चालक बेदरकारपणे वाहन चालवीत होता.

महामार्ग पोलिसांना संशय येताच त्यांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता बंगाली कॅम्प परिसरात ट्रक थांबविण्यात आला, ट्रक चालकाने वाहन उभं करीत तिथून पळ काढला.

सदर ट्रक ची तपासणी केली असता त्यामध्ये जनावर आढळले, सदर ट्रक चालक हा जनावरांची अवैध वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाल्यावर याची सूचना रामनगर पोलिसांना देण्यात आली.

सदरची यशस्वी कारवाई पोउपनी मोरे
पोलीस कर्मचारी काशिनाथ निघोट, राजेश यादव, प्रवीण बोंडे, प्रमोद पिसे यांनी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने