चंद्रपूर जिल्ह्यात 18 वर्षीय मुलाने आणली बंदूक

चंद्रपूर जिल्ह्यात 18 वर्षीय मुलाने आणली बंदूक

Chandrapur arm act

राजुरा/चंद्रपूर - 19 सप्टेंबर पासून जिल्ह्यात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे, गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर आहे.
Chandrapur local crime branch



चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मोहीम राबवित राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथील 18 वर्षीय मुलाकडून देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुस जप्त केले.

18 वर्षीय राजरतन राहुल वनकर या मुलांकडे देशी बनावटीचा कट्टा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी 18 सप्टेंबर ला राजरतन हा राजुरा बस स्टॉप जवळ कट्टा कमरेला बांधून फिरत होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजरतन ला अटक करीत त्याच्याजवळून कट्टा व जिवंत काडतुस जप्त केले.

आरोपी राजरतन वर भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केला असून त्याच्याजवळून पोलिसांनी कट्टा (अग्निशस्त्र), जिवंत काडतुस व मोबाईल असा एकूण 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, अनुप डांगे, जमिर पठाण, नितीन महात्मे, मिलिंद चव्हाण, प्रसाद धुळगुंडे व दिनेश अराडे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने