प्रेयसीच्या नावावर प्रियकराने घेतले कर्ज आणि घडले भयावह प्रकार

प्रेयसीच्या नावावर प्रियकराने घेतले कर्ज आणि घडले भयावह प्रकार

Pune crime news

पुणे - जानेवारी 2023 मध्ये तरुणीचे युवकांसोबत प्रेमसंबंध जुळले, त्यानंतर त्या प्रियकराने तरुणीच्या नावावर क्रेडिट कार्ड, विविध लोन app वरून कर्ज काढले, मात्र ते कर्ज न फेडल्याने तरुणीने आत्महत्या केली. Loan app
Personal app



आरोपी प्रियकरविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 वर्षीय रसिका उर्फ राणी रवींद्र दिवटे असे मृतक तरुणीचे नाव आहे.

मृतक रसिका व आदर्श या दोघांचे प्रेमसंबंध जानेवारी महिन्यापासून सुरू होते, आदर्श ने रसिका च्या नावावर क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन व विविध लोन app वरून तब्बल पावणे चार लाख रुपयांचे कर्ज आदर्श काढले होते. त्याचे हफ्ते मी फेडणार म्हणून तरुणीने कर्जाला होकार दिला मात्र आदर्श कर्जाचे हफ्ते फेडत नव्हता.


यावरून आदर्श व रसिका चे नेहमी वाद होत होते, कर्जाचे हफ्ते न फेडल्याने रसिकाला मानसिक त्रास होऊ लागला, या मानसिक त्रासाला कंटाळून रसिका ने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

मृतक रसिका च्या आईने आदर्श मिलन यांच्या विरोधात तक्रार देत रसिका ने आत्महत्या का केली याबाबत सविस्तर माहिती दिली.

पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आदर्श मिलन वर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने