चंद्रपूर जिल्ह्यात 3 दिवसात 2 देशी कट्टे जप्त

चंद्रपूर जिल्ह्यात 3 दिवसात 2 देशी कट्टे जप्त

Chandrapur local crime branch

चंद्रपूर - आगामी सणासुदीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरातील नागरिकांना भयमुक्त करण्याचे प्रयत्न करीत आहे, जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखा करीत असून 3 दिवसात दोघांकडून देशी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला आहे.

Chandrapur local crime branch



18 सप्टेंबर ला राजुरा येथील 18 वर्षीय राजरतन वनकर या मुलाकडून देशी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती, राजुरा भाग संवेदनशील असून त्या तालुक्यात घडणाऱ्या घटनेवर स्थानिक गुन्हे शाखा नजर ठेवून होती.



3 दिवसांनी विरुर पोलीस स्टेशन हद्दीतील कोहपरा गावातील 19 वर्षीय युवक देशी कट्टा बाळगत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.



माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोहपरा गावातील 19 वर्षीय अमर रमेश आत्राम यांच्या घरी धाड मारली असता अमर जवळ देशी कट्टा व 1 जिवंत काडतुस आढळून आले.



पोलिसांनी अमर आत्राम वर भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करीत अमर जवळून देशी कट्टा, काडतुस, मोबाईल असा एकूण 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.



सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचया मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोउपनी अतुल कावळे, पोलीस कर्मचारी अनुप डांगे, जमिर पठाण, नितेश महात्मे, मिलिंद चव्हाण व प्रसाद धुलगंडे सहित दिनेश अराडे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने